PM Narendra Modi : मी हिंदू-मुस्लिम करायला लागलो तर..! पंतप्रधान मोदींनी फेटाळले आरोप

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींकडून हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. त्याला मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) चार टप्पे पूर्ण झाले असून आणखी तीन टप्पे बाकी आहेत. या टप्प्यांमध्ये अनेक ठिकाणी हायप्रोफाईल लढती होणार आहेत. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधींचाही समावेश आहे. मोदींनी मंगळवारी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी एका मुलाखतीमध्ये हिंदू-मुस्लिम यावरून सुरू असलेल्या राजकारणावर मोठे भाष्य केले आहे.

पंतप्रधान मोदींकडून (PM Narendra Modi) मागील अनेक प्रचार सभांमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करण्यात आली. यामध्ये काँग्रेसकडून (Congress) तुमची संपत्ती हिसकावून घेत ती घुसखोर आणि जास्त मुले असलेल्यांना वाटली जाईल, अशी टीका मोदींनी केली होती. त्यांनी ओबीसीतून (OBC) मुस्लिमांना देण्यात आलेल्या आरक्षणावरही टीका केली होती. त्यानंतर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी मोदींच्या या विधानांवरून टीका केली होती. हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मोदी करत असल्याचा आरोपी विरोधकांनी केला होता. (Latest Political News)

PM Narendra Modi
Lok Sabha Election : '400 पार' झाल्यास ज्ञानव्यापी मशिदीच्या जागी मंदिर, POK वर ताबा... ; भाजप मुख्यमंत्र्यांचा दावा!

मोदींनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले, लोकांनी अधिक मुलांना जन्म देऊन नये, असे आवाहन मी करतो तेव्हा मी मुस्लिमांविषयी (Muslim) बोलतोय, असे त्यांना का वाटते. मला हे समजत नाही. गरीब हिंदू (Hindu) कुटुंबातही ही समस्या आहे. ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याएवढे सक्षम नाहीत. मी कधीच हिंदू-मुस्लिम नाव घेतले नाही. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशातील लोक आम्हालाच मतदान करतील, असा विश्वास व्यक्त करून मोदी म्हणाले, ज्यादिवशी मी हिंदू-मुस्लिम करायला सुरूवात करेन, त्यादिवशी मी सार्वजनिक जीवनात राहण्यायोग्य राहणार नाही. मी कधीही हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण होऊ देणार नाही, हे माझे वचन आहे, असे मोदींनी स्पष्ट केले. सबका साथ सबका विकास हा माझा मंत्र आहे. काही चुकीचे वाटत असेल तर मी त्यावर लगेच बोलतो, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिमा 2002 पासून खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही मोदींनी केला. ते म्हणाले, अहमदाबादमधील मानेक चौक येथे एक सर्व्हे करण्यात आला होता. तिथे सर्व व्यापारी मुस्लिम आणि ग्राहक हिंदू होते. तिथे कुणीतही माझ्याविषयी चुकीचे बोलले. दुकानदाराने त्यांना थांबवून मोदींविरोधात एक शब्दही बोलू नका. आमची मुलं मोदींमुळे शाळेत जात आहेत, असे सांगितले.  

PM Narendra Modi
Narendra Modi Vs Rahul Gandhi : पंतप्रधान मोदींपेक्षा राहुल गांधी सात पटीने श्रीमंत, कुणाची किती संपत्ती?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com