Pune Political News : निर्णायक 'वडगाव शेरीत' बदललेल्या मतदानाच्या आकडेवारीने कुणाची वाढली धाकधूक?

Lok Sabha Election 2024 : गतवेळी झालेल्या मतदानाची तुलना करता तब्बल 26311 इतके मदार वाढले आहे. एकूण टक्केवारीच्या अर्धा टक्के मते वाढली आहेत.
Pune Political News
Pune Political NewsSarkarkarnama

Pune News : नुकतंच पुणे लोकसभा मतदारसंघासाठी (13 मे ) मतदान पार पडले. यात विशेष बाब म्हणजे यातील सहापैकी विधानसभा मतदारसंघांपैकी शहरातील सर्वात जास्त मतदार असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या वडगाव शेरी मतदारसंघ मतदान करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गतवेळी झालेल्या मतदानाची तुलना करता तब्बल 26311 इतके मदार वाढले आहे. एकूण टक्केवारीच्या अर्धा टक्के मते वाढली आहेत. (Lok Sabha Election 2024)

वडगाव शेरी हा मतदारसंघ 2014 च्या वेळी नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजपने मिळवला होता. यामुळे याचा परिणाम पालिका निवडणुकातही उमटलेले दिसून आले. मात्र 2019 च्या विधानसभेला हा मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादीने खेचून आणला. मात्र असे असले तरी लोकसभेच्या निवडणुकांचा विचार करता प्रत्येक वेळी या मतदारसंघाने भाजपले चांगले मताधिक्य दिले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना 45 हजारांचे मताधिक्य दिले. आता वाढलेले नवमतदारांनी लोकसभेच्या फॉर्म्युला प्रमाणे जर भाजपला मताधिक्य दिले तर धंगेकर यांची येथून पीछेहाट होऊ शकते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Political News
Praful Patel News: शिवरायांची ओळख असलेला 'जिरेटोप' प्रफुल पटेलांनी मोदींना दिला भेट; शरद पवार गटाच्या नेत्याचा संताप

इतर जिल्हे आणि राज्यातून स्थलांतरीत झालेले लोक मोठ्या प्रमाणात आहेत. अशा संमिश्र मतदारसंघ असलेल्या या ठिकाणी धंगेकर आणि मोहोळ (Muralidhar Mohol) दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रयत्न केले गेले आहेत. .यासाठी रणनीतीही आखण्यात येत आली. या ठिकाणी रिपब्लीकन आठवले गटाला मानणाराही घट आहे. धंगेकर यांची तळागाळात आणि सामान्य माणसांमध्ये असणरी लोकप्रियता मोठी आहे. महाविकास आघाडीचे मित्र व घटक पक्षांचे कामही धंगेकरांसाठी काही अंशी फायदेशीर ठरु शकणार आहे.

Pune Political News
PM Narendra Modi Nashik Sabha: कांद्याचा मुद्दा तापला, पंतप्रधानांच्या सभेत गोंधळ; मोदी म्हणाले,जय श्रीराम..!
Pune Political News
NCP Party Symbol Case : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाची सुनावणी आता जुलै महिन्यात !

येरवडा- वडगाव शेरी या परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांचेही मोठे केडर आहे. याचा महाविकास आघाडीला फायदा होणार आहे. तर भाजपच्या प्रचाराच विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांची मोठी रसद मिळणार आहे. जगदीश मुळीक हे सुरुवातीला नाराजीनाट्यानंतर प्रचारात सहभागी झाले. परप्रांतीयांसाठी मतदारांचे मेळावे आयोजित केले. भाजपनेही चांगली हवा तयार केली. आता प्रचार आणि मतदाना झाल्यानंतर या मतदारसंघातील लोक महायुती आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) कौल देतात, हे पाहणे फार रंजक ठरणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com