Soniya Gandhi-uddhav Thackeray-Sharad Pawar Sarkarnama
देश

India Aaghadi News : मोठी बातमी ! इंडिया आघाडी जागा वाटप बैठक 14 किंवा 15 जानेवारीला होणार ?

Chaitanya Machale

Delhi News : केंद्रात सत्ताधारी असलेल्या मोदी सरकारला येणाऱ्या काळात सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणूक लढविली जाणार आहे. त्यासाठी कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या यावर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यासाठी इंडिया आघाडीचे घटक असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसच्या सोनिया गांधी यांची बैठक होणार आहे. येत्या 14 किंवा 15 जानेवारीला ही बैठक दिल्ली येथे होणार आहे. यामध्ये जागा वाटपाचा अंतिम फॅार्म्युला ठरविला जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जोरदार हालचाली सुरु आहेत. 'मविआ'त जागावाटपावरुन काँग्रेस आणि ठाकरे गट वेगवेगळे दावे करत आहे. निवडणुकीत ठाकरे गटाने 23 जागा लढवण्याचे संकेत दिले आहेत. मात्र काँग्रेसने यासाठी विरोध केला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या यासाठी प्रत्येक पक्षाने आपल्या प्रमुख नेत्यांचा समावेश असलेली समिती बनविली आहे. या समितीची बैठक मंगळवारी (९ जानेवारी) होणार आहे. त्यामध्ये सविस्तर चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

समितीने महाराष्ट्रातील 48 जागांबाबत घेतलेल्या निर्णयाला अंतिम मान्यता देण्यासाठी 14 किंवा 15 जानेवारीला दिल्ली येथे बैठक होणार आहे. सोनिया गांधी,(Sonia Gandhi) काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्ज्जुन खर्गे, शरद पवार, उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहे. या दिवशी होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत जागावाटपाच्या फॉर्म्युला संदर्भात तीन पक्षांमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे.

या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यासंदर्भात देखील सविस्तर चर्चा होणार आहे. याबरोबरच 'वंचित'ला 'मविआ'मध्ये किती जागा द्यायच्या यावरही चर्चा होणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी मध्ये सहभागी होईल, अशी इच्छा वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अनेक वेळेला व्यक्त केलेली आहे. मात्र त्यांना महाविकास आघाडीमध्ये घ्यायचे की नाही, यावर ठोस निर्णय अद्यापही झालेला नाही. दिल्ली येथे जागा वाटपाबाबत प्रमुख नेत्यांच्या उपस्थित होणाऱ्या या महत्वाच्या बैठकीत वंचित बहुजन बाबत देखील चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर कोणता पक्ष किती महाराष्ट्रातील जागा लढणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

ठाकरे गटाचा 23 जागांवर दावा ?

लोकसभेच्या जागा वाटपाचा निर्णय कधी होतो, यावर इच्छुक उमेदवार आणि इंडिया आघाडीतील पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचं विशेष लक्ष असणार आहे. शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या वतीने राज्यातील 23 जागांवर दावा केला जात आहे. याला काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी विरोध केलेला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे होणाऱ्या या महत्वाच्या बैठकीकडे सर्वच पक्षाचे लक्ष लागलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT