India Budget 2024 Sarkarnama
देश

India Budget 2024 : 'महागाई तितकीशी वाढली नाही, लोकांचे उत्पन्न वाढले'; सीतारमण यांचा दावा!

Union budget 2024 update : भारताचे आर्थिक क्षेत्र मजबूत होत आहे.

Chetan Zadpe

Budget 2024 Expectations : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 या आर्थिक वर्षाचा अंतरिम बजेट संसदेत सादर करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आज सादर होत असलेल्या अंतरिम बजेटमधून अर्थमंत्री मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या बजेट भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या हमींचाही ठळकपणे उल्लेख केला आहे. यावेळी त्यांनी महागाई तितकीशी वाढली नाही, मात्र लोकांचे उत्पन्न वाढल्याचा दावा केला आहे. (Budget News 2024)

अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत बजेट सादर करताना म्हणाल्या, 'भारत एक जागतिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे. भारताबाबात बोलायचे झाले तर सरकारचे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत. लोकांचे उत्पन्न वाढले आहे. महागाई फारशी वाढलेली नाही. मोदी सरकारच्या कार्यकाळात जनता सक्षम झाली आहे. या सरकारमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जात आहे. भारताचे आर्थिक क्षेत्र मजबूत होत आहे. लोकांसाठी संधी अधिक वाढवल्या जात आहेत.

कोरोना साथ येऊनही भारत वेगाने प्रगती करत आहे. आपला युवक देशाच्या विकासावर बोलत आहे. देशातील जनतेने आमचे सरकारला साथ दिला आहे. मागील दहा 10 वर्षात अनेक विकासाचे कार्यक्रम राबविण्यात आले. गरिबासाठी घरासाठी घर असो, प्रत्येक घराला पाणी पोहचवणे असो, गरिबांचे बँक खाते उघडणे असो, आम्ही विक्रमी वेळेत प्रत्येक क्षेत्रात काम करत आहोत, देशातील 80 कोटी गरिब जनतेला आम्ही रेशन पोहोचवले, असेही सीतारमण म्हणाल्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT