Why CDS Stressed on Being Ready for War : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अद्याप कमी झालेला नाही. दोन्ही देशांनी एकमेकांवर लादलेली बंधने अद्याप कायम आहेत. त्यात सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी देशाच्या शत्रुंना ललकारले आहे. तुम्हाला शांतता हवी असेल तर युध्दासाठी तयार राहावे लागेल, असे ते म्हणाले आहेत.
मध्य प्रदेशातील महू येथे मंगळवारी आर्मी वॉर कॉलेजमध्ये आयोजित रण-संवाद कार्यक्रमात जनरल चौहान यांनी हे विधान केले आहे. ते म्हणाले, आम्ही शातंताप्रिय देश आहोत, पण शांतीवादी नाही. त्यामुळे शत्रुंनी चुकीचा समज करून घेऊ नये. देशाचे सैन्य नेहमी युध्दासाठी सज्ज असते. कारण शक्तीमुळेच शांतता येऊ शकते.
जनरला चौहान यांनी कवी रामधारी सिंह दिनकर यांच्या एका कवितेतील ओळीही यावेळी बोलून दाखविल्या. ‘क्षमा शोभती उस भुजंग को जिसके पास गरल हो, उसको क्या जो दंतहीन विषरहित, विनीत, सरल हो’, या ओळींचा आधार घेत चौहान यांनी तुम्हाला शांती हवी असेल तर युध्दासाठी तयार राहा, असे विधान केले.
भविष्यातील युध्दाबाबतही चौहान यांनी भाष्य केले. ते म्हणाले, रण-संवादाचा उद्देश ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करणे नाही. कारण ऑपरेशन सिंदूरमधून आम्ही जे शिकलो, ते कार्यान्वित करत आहोत. भविष्यातील युध्द खूप खरतनाक असेल. त्यामध्ये आम्ही मिळूनच (लष्कर, हवाई दल आणि नौदल) विजयी होऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आत्मनिर्भर आणि सशक्त बनायचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनादिवशी लाल किल्ल्यावरून सुदर्शन चक्र मिशनबाबत केलेल्या घोषणेबाबत बोलताना जनरल चौहान म्हणाले, त्यावर काम सुरू झाले आहे. डीआरडीओने रविवारी इंटीग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टीमची केलेली यशस्वी चाचणी हा त्याचाच भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हे मिशन 2035 मध्ये पूर्ण झाल्यानंतर भारत आयर्न डोम प्रमाणे देशाची सुरक्षा करेल. भारतीय सैन्याला जगभरातील अत्याधुनिक सैन्याच्या श्रेणीत आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.