
Updates from Former Vice President’s Residence : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून एकदाही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलेला नाही. ना एकटे, ना कुटुंबासोबत ते कुठेही घराबाहेर दिसत नाहीत. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्या अचानक गायब होण्यावरून मोदी सरकारला धरले आहे. आता धनखड यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
जगदीप धनखड हे दिल्ली सोडून कुठेही गेलेले नाहीत. त्यांना मिळालेल्या अधिकृत बंगल्यामध्ये ते पत्नीसह राहत आहेत. ते 21 जुलैपासून याच बंगल्यात असून त्यांची मुलगी कामना वाजपेयी या गुरूग्राम येथून दररोज त्यांना भेटण्यासाठी दिल्लीत येत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या धनखड यांची प्रकृतीही ठणठणीत आहे.
इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, धनखड हे सध्या ओटीटीवर आवडत्या मालिका बघत आहेत. योगाभ्यास आणि टेबल टेनिस खेळण्यातही ते व्यस्त असतात. बंगल्यातील मिनी स्पोट्स कॉम्प्लेक्समध्ये ते सायंकाळी टेबल टेनिस खेळतात. तर सकाळची सुरूवात योगाभ्यासाने होते. त्यासोबत ते ओटीटीवर ‘द लिंकन लॉयर’ आणि ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ असे लोकप्रिय शो पाहत असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
जगदीप धनखड हे बंगल्याबाहेर येत नसले तरी त्यांच्या पत्नी सुदेश धनखड यांनी मागील महिनाभरात तीनवेळा राजस्थानचा दौरा केला आहे. रस्ते मार्गानेच त्या राजस्थानला गेल्या होत्या. धनखड कुटुंबाकडून जयपूरमध्ये आपल्या वारसाहक्काने मिळालेल्या शेतजमीनीवर एक व्यावसायिक इमारत उभारत असल्याची माहिती आहे.
धनखड यांची मुलगी कामना वाजपेयी या दररोज आई-वडिलांची भेट घेण्यासाठी दिल्लीतील घरी जात आहेत. त्या सध्या गुरूग्राममध्ये राहतात. जयपूर येथील शेतजमीनीवर पूर्वी एक छोटी इमारत होती. त्यावर कामना फार्म हाऊस असा बोर्ड होता. मुलीच्या नावाने फार्म हाऊस होते. आता त्या जागेवर इमारती उभी केली जात आहे, असे वृत्ता नमूद करण्यात आले आहे.
उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर धनखड दाम्प्त्याने उपराष्ट्रपतींसाठी असलेला अधिकृत बंगला सोडण्याची तयारीही सुरू केली आहे. सरकारने त्यांना दुसरे निवासस्थान देण्याची वाट पाहत आहेत. हा बंगला मिळताच ते शिफ्ट होतील. या बंगल्यामध्ये त्यांना माजी उपराष्ट्रपतींना मिळणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध असतील. सध्यातरी धनखड यांनी सरकारी वाहनांचा वापर बंद केल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.