
Impact of Jarange Patil’s Statement on State Politics : मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम असलेले मनोज जरांगे पाटील यांची मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक राजेंद्र साबळे यांनी भेट घेतली. दोघांमध्ये मीडियासमोरच चर्चा झाली. आम्हाला मुंबईकडे जाण्यासाठी एक स्वतंत्र मार्ग देण्याची विनंती जरांगेंनी केली. तसेच आरक्षणाच्या निर्णयाची आजच अंमलबजावणी झाली तर मुंबईला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे निरोप देण्यासही सांगितले. मराठा आणि कुणबी एक आहेत, हे दाखविण्यासाठी 58 लाख नोंदीचा पुरावा आहे. अनेक सरकारी दस्तावेज आहेत, त्याला कुणीच रोखू शकत नाही. आरक्षणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा. लगेच 3 लाख ट्रक भरून गुलाल फडणवीस साहेबांच्या बंगल्यावर टाकू. त्यांनी कधी बघितली नसतील एवढी फुलं आणतो.
महाराष्ट्रातले सगळे जेसीबी तिथं बोलवून सगळीकडून फुलं टाकतो. तेही आनंदाने बाहेर येतील. गोरगरिबांच्या लेकरांची नाराजी कशाला घेता, हे त्यांना सांगा, असे जरांगे पाटील साबळेंना म्हणाले. मनभेद, नाराजी असेल तर ती समाजाच्या माथ्यावर टाकू नका. मला जातीसाठी जेलमध्ये टाका. मी सडायला तयार आहे, असेही जरांगे म्हणाले.
मी तळमळीने माझं रक्त जाळून घेतलं. माझ्या हाडाला शिरा चिकटल्यात. हाताला खड्डे पडलेत. मी कधीही मरू शकतो. मी माझ्या समाजाचा थोड्या दिवसाचा पाहुणा आहे. तरीही झटतोय मी. समाजाला वेठीस धरू नका, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. आज दहा वाजेपर्यंत जरी अंमलबजावणी झाली तरी आम्ही वाटू पाहू, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवात आझाद मैदानात एकही मिरवणूक नसते, तिथे अडथळा येत नाही. आम्हाला एक रस्ता दिला तर कुणालाही त्रास होणार नाही. आम्हाला राजकारण करायचे नाही. पण आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. आम्हाला संध्याकाळपर्यंत रस्ता सांगा, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. तर साबळे यांनी आंदोलनाच्या मार्गाचा नकाशा आपल्याला देण्याची विनंती त्यांनी केली. मुंबईत शांततेतच येणार, असा शब्द जरांगे पाटील यांनी दिला. साबळे यांनी आपला निरोप मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवतो, असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.