India vs Pakistan  Sarkarnama
देश

India Vs Pakistan War : मोठी बातमी ! भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम जाहीर; घाबरलेल्या शहाबाज शरीफ यांनी केली होती अमेरिकेला विनंती

India Pakistan ceasefire : अमेरिकेने मध्यस्थी केल्याने भारत-पाकिस्तनामध्ये शस्त्रसंधीवर एकमत झाले आहे. शनिवारी पाच वाजल्यापासून दोन्ही देशात युद्धविराम झाल्याची माहिती केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

Sachin Waghmare

India Pakistan ceasefire : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २४ जणांना प्राण गमवावा लागला होता. त्यानंतर भारताने एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करीत प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर पाकिस्तानने ड्रोनच्या मदतीने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न भारताने हाणून पाडला.

भारताने केलेल्या या दहशतवादाविरोधातील कारवाईबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा पाठिंबा मिळाला होता. मात्र, अमेरिकेने मध्यस्थी केल्याने भारत-पाकिस्तनामध्ये शस्त्रसंधीवर एकमत झाले आहे. शनिवारी पाच वाजल्यापासून दोन्ही देशात युद्धविराम झाल्याची माहिती केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर युद्धविराम झाला आहे. शनिवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून हा युद्धविराम घेण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी याबाबत माहिती दिली आहे. आता याबाबत दोन्ही देशांची 12 मे रोजी डीजीएमओमध्ये चर्चा होणार आहे. शनिवारी दुपारी 3.35 मिनिटांनी पाकच्या डीजीएमओंनी भारताच्या डीजीएमओंना फोन केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता दोन्ही देशादरम्यानचे युद्ध थांबले आहे.

शनिवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी लागू होत असल्याचं त्यांनी जाहीर केले. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमारेषेवर तणाव होता. या तणावानंतर भारताने 7 मे रोजी एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धजन्य परिस्थिती उद्भवली. दोन्ही बाजूंनी गोळीबार आणि हवाई हल्ले सुरू होते. अखेर, या हल्लेखोरीला अखेर युद्ध विराम मिळाला आहे.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, "पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) आज दुपारी 3:35 वाजता भारतीय लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांना फोन केला. दोन्ही बाजूंनी भारतीय प्रमाणवेळेनुसार 5 वाजतापासून दोन्ही बाजूंकडून जमिनीवर, हवेत आणि समुद्र असा सर्वप्रकारचा गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज, या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही बाजूंना सूचना देण्यात आल्या आहेत. लष्करी ऑपरेशन्स महासंचालक 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा चर्चा करतील." त्यामुळे, भारत आणि पाकिस्तान यांच्या सुरू असलेल्या हल्ल्यांना पूर्णविराम मिळाला आहे.

दहशतवादाविरुद्ध तडजोड न करणारी भूमिका कायम

भारत आणि पाकिस्तानने शनिवारी गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक सामंजस्य करार केला आहे. भारताने सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध सातत्याने ठाम आणि तडजोड न करणारी भूमिका कायम ठेवली आहे. ती पुढेही कायम राहील, असे केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S jayashnkar) यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT