Operation Sindoor Sarkarnama
देश

Operation Sindoor: सर्वात मोठी बातमी! भारतानं अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला; पाकिस्तानमध्ये घुसून 'करारा जवाब'; दहशतवादी अड्डे उध्वस्त

Indian Army Strikes On Terrorist Hideouts In Pok : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा भारतीय लष्कराने बदला घेतला आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला.

Deepak Kulkarni

Operation Sindoor News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती.या हल्ल्याला भारताकडून करारा जवाब दिला जाईल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ठणकावून सांगितलं होतं.पहलगाम हल्ल्यानंतर सरकार आणि भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख अधिकारी यांच्यात बैठकांचा धडाका लावला सुरू होता. पण भारतकशी आणि कधी कारवाई करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं. अखेर भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला घेताना पाकिस्तानच्या हद्दीत घुसुन दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले उध्वस्त करण्यात आले आहेत.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा(Pahalgam Terror Attack) भारतीय लष्कराने बदला घेतला आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे, ज्याला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. या हल्ल्यात एकूण नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, जिथून दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि निर्देश केले जात होते.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. या हल्ल्यात एकूण नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते, जिथून दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि निर्देश केले जात होते. भारतीय वायुसेनेकडून बुधवारी (ता.7) रात्री पावणेदोनच्या सुमारास 'ऑपरेशन सिंदूर' सुरु करण्यात आले.

या हल्ल्याबाबत संरक्षणखात्याकडून माहिती देण्यात आली आहे.काही वेळापूर्वी, भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर'सुरू केले, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला.ज्याठिकाणाहून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांचं प्लॅनिंग केले जात होते.

भारताने स्ट्राइकची घोषणा केल्यानंतर काही मिनिटांतच, भारतीय लष्कराने ट्विटरवर पोस्ट केले, "न्याय झाला. जय हिंद." एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यांनी पाकिस्तानी हद्दीत मुझफ्फराबाद, कोटली आणि बहावलपूरमधील अहमद पूर्व भागात तीन ठिकाणी लक्ष्य केले असल्याची पुष्टी पाकिस्तानी लष्कराने बुधवारी केली. या हल्ल्याबाबत माहिती देण्यात आली आहे.

भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईत एकूण 9 स्थळांना लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच भारतीय वायुसेनेकडून यावेळी कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष्य करण्यात आले नाही. लक्ष्यांची निवड आणि अंमलबजावणीच्या पद्धतीत भारतानं बराच संयम दाखवल्याचंही यावेळी संरक्षण खात्यानं म्हटलं आहे.

तसेच पहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले असल्याचंही नमूद केलं आहे.ज्यामध्ये 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाची हत्या करण्यात आली होती.या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही ही कारवाई केल्याचंही सांगण्यात आले आहे.या 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे.

इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (डीजी आयएसपीआर) चे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार,भारतीय लष्करानं केलेल्या या 'ऑपरेशन सिंदूर' या मोहिमेत एका मुलाचा मृत्यू झाला, तर एक पुरूष आणि एक महिला गंभीर जखमी झाली. "काही काळापूर्वी, भारताने बहावलपूरच्या अहमद पूर्व भागातील सुभानुल्लाह मस्जिद, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन ठिकाणी हवाई हल्ले केले.रात्री उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत डीजी आयएसपीआर या हल्ल्याबाबतची माहिती दिली.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. दोन्ही देशांतील संबंध प्रचंड तणावाचे झाले आहेत. अनेक कठोर निर्णय घेतले जात असतानाच दोन्ही देशांकडून युध्दाची तयारीही सुरू केली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील राज्यांना अलर्ट केले आहे. देशातील तब्बल 244 शहरांमध्ये बुधवारी एकाचवेळी सुरक्षेच्या तयारीबाबतचे मॉक ड्रील घेतले जाणार आहे. या यादीत मुंबई, पुण्यासह उरण, तारापूर अशा महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT