Amit Shah: एकीकडे युध्दाची तयारी,तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेचा बडा नेता म्हणतो; 'अमित शहांना गृहमंत्रिपदावरुन हटवा, कारण...'

India Vs Pakistan : युद्धसरावात आम्हाला बंदुका देणार का? भोंगे वाजणार, ब्लॅक आऊट होणार. आम्ही 1971 साली हे पाहिलंय. याची माहिती लोकांना दिली जाऊ शकते. जशा थाळ्या-टाळ्या वाजवल्या, तसं युद्धसरावात अजून काही दिवस घालवतील,पण देशाचं सैन्य कायम सज्ज असतं.
Amit Shah Uddhav Thackeray Narendra Modi
Amit Shah Uddhav Thackeray Narendra Modisarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. दोन्ही देशांतील संबंध प्रचंड तणावाचे झाले आहेत. अनेक कठोर निर्णय घेतले जात असतानाच दोन्ही देशांकडून युध्दाची तयारीही सुरू केली आहे. अशातच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारानं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मोठी मागणी केली आहे.

देश असो वा राज्य दोन्ही ठिकाणच्या विविध मुद्द्यांवरुन कुणाचीही भीडभाड न ठेवता बिनधास्त भूमिका मांडण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नेहमीच आघाडीवर असतात. आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनाच हटवण्याची मागणी केली आहे.

संजय राऊत म्हणाले,देशाचे गृहमंत्री अमित शाह अपयशी गृहमंत्री आहेत.त्यांना पुढची परिस्थिती हाताळता येणार नाही. त्यामुळे त्यांना हटवण्यात यावं. पुढे जी परिस्थिती निर्माण होईल,त्यासाठी आत्तापासून सगळ्याच पक्षांना विश्वासात घेऊन काम करायला हवं. कारण युद्धानंतर जी परिस्थिती निर्माण होते,ती अफगाणिस्तान,युक्रेन,इराणमध्ये आहे, युद्धानंतर अनेक अडचणींना सामोर जावं लागेल. म्हणून तुम्ही देशातल्या विरोधीपक्षांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे,असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

Amit Shah Uddhav Thackeray Narendra Modi
Rupali Patil Thombare : लक्ष्मण हाके म्हणतात, अजित पवारांवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करा; रुपाली पाटलांनी भरला दम

संजय राऊत यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना आवाहन करताना भारत-पाकिस्तानात तणाव आहे, त्याचा फटका भारताला भविष्यात आर्थिकदृष्टया बसण्याची शक्यता आहे. पण देश आणि जनता राष्ट्राच्या सुरक्षेसाठी, अभिमानासाठी तयार आहे. एक पक्ष, एक व्यक्ती नेतृत्व करतोय म्हणून नाही, आम्ही लढायला सज्ज आहोत" असं संजय राऊत यांनी म्हटलं.

युद्धसरावात आम्हाला बंदुका देणार का? भोंगे वाजणार, ब्लॅक आऊट होणार. आम्ही 1971 साली हे पाहिलंय. याची माहिती लोकांना दिली जाऊ शकते. जशा थाळ्या-टाळ्या वाजवल्या, तसं युद्धसरावात अजून काही दिवस घालवतील,सैन्य कायम सज्ज असतं.भारतीय सैन्य कायम सज्ज असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला.

Amit Shah Uddhav Thackeray Narendra Modi
Cabinet Meeting : ऐतिहासिक गाव, कोट्यवधींची बैठक; अखेर CM फडणवीसांनी पेटारा उघडलाच; एका झटक्यात घेतले 'हे' 10 मोठे निर्णय

पाकिस्तान किंवा दहशतवाद्यांनी आमच्या 27 लोकांचा बळी घेतला,त्या संदर्भातला बदला काय?असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. ते म्हणाले, “14-15 दिवस झालेत. दिल्लीत भेटीगाठी सुरु आहेत. आपल्याला जपान, पुतिन यांनी पाठिंबा दर्शवला आहे.उद्या जनतेचा युद्धसराव असून आम्ही मॉक ड्रीलसाठीही तयार असल्याचंही राऊत म्हणाले.

भारतातली जनता तेवढी अज्ञानी नाही. भारत-पाकिस्तान युद्धापेक्षा मोठ युद्ध कोरोनाविरोधात लढलो आहोत. भारतातील जनता मानसिकदृष्टया मजबूत आहे. या सगळ्या गोष्टीत तुम्ही जनतेला मानसिकदृष्टया अडकवून ठेवलं आहे. अनेक देशात एखाद्या देशावर सैन्य तळावर,नागरिकावर हल्ला झाला तर 24 तासांत बदला घेतला जातो असा दाखलाही खासदार संजय राऊतांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com