KP Patil: अजितदादांच्या सल्ल्यानुसार के पी पाटलांनी खरंच राजकीय निवृत्ती घ्यावी का?

Kolhapur Politics : राधानगरी विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार के पी पाटील हे सलग चारवेळा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामध्ये दोनवेळा ते विधानसभा सदस्य राहिले आहेत. तर सलग दोनवेळा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आहे.
Ajit pawar and KP Patil .jpg
Ajit pawar and KP Patil .jpgSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मागील आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार के पी पाटील यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले. इतकेच नव्हे तर त्यांना राजकारणातून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या या सल्ल्यानंतर माजी आमदार के पी पाटील यांनी राजकारणातून खरंच निवृत्ती घ्यावी का? याची चर्चा आता गल्लीबोळात आणि चौका चौकात रंगू लागली आहे.

मुळात राजकीय सोयीस्कर भूमिका घेण्यामध्ये माजी आमदार के पी पाटील पटाईत आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवारीची कोची निर्माण झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे बंधन हातात बांधले. पण पराभूत होताच आणि महायुतीचं सरकार येताच पुन्हा एकदा यू टर्न घेत त्यांना महायुती मधील राष्ट्रवादीचे वेध लागले आहे. यावरूनच सारखे पक्ष बदल करणाऱ्या के पी पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा हा घरचा आहेर म्हणावा का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

लोकसभा निवडणुकीत माजी आमदार के पी पाटील (KP Patil) यांनी महायुतीचे उमेदवार माजी खासदार संजय मंडलिक यांना पाठिंबा दिला. मात्र संजय मंडलिक यांच्या पराभवानंतर राधानगरी विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांना मताधिक्य देण्यात दुसऱ्या स्थानावर राहिल्याने त्यांच्या भूमिकेविरोधात जोरदार चर्चा रंगली. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची गोची निर्माण झाल्यानंतर महायुतीला रामराम ठोकत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा झेंडा हातात घेतला.

Ajit pawar and KP Patil .jpg
Cabinet Meeting : ऐतिहासिक गाव, कोट्यवधींची बैठक; अखेर CM फडणवीसांनी पेटारा उघडलाच; एका झटक्यात घेतले 'हे' 10 मोठे निर्णय

मात्र, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पुन्हा एकदा के पी पाटील यांनी परतीचा प्रवास सुरू केला. सातत्याने के पी पाटील यांची भूमिका स्वतःच्या राजकीय भवितव्याच्या बाजूने राहिल्याने जन माणसात राजकीय प्रतिमा मलीन झाली आहे. याच प्रमुख कारणाने विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. केवळ स्वतःसाठीच राजकीय भूमिका घेत सातत्याने के पी पाटील यांची भूमिका राहिल्याने विधानसभा निवडणुकीत फटका बसला.

महायुती सरकारच्या काळात दोन राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर माजी आमदार के पी पाटील यांनी संयमाची भूमिका घेतली. मात्र बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या कारवाईच्या अनुषंगाने के पी पाटील यांनी महायुतीतील राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या दौऱ्यात आपण अजित पवार यांच्यासोबत गेलोच नाही असा निर्वाळा के पी पाटील यांनी करत खळबळ उडवून दिली.

Ajit pawar and KP Patil .jpg
Amit Shah: एकीकडे युध्दाची तयारी,तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेचा बडा नेता म्हणतो; 'अमित शहांना गृहमंत्रिपदावरुन हटवा, कारण...'

त्यानंतर ठाकरे गटात प्रवेश केला. मात्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पुन्हा एकदा महायुतीतील राष्ट्रवादीशी सुत जुळवले. मागील आठवड्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले असता के पी पाटील हे अग्रभागी दिसले. मात्र याच गोष्टीचा अंदाज खुद्द अजित पवार यांनी घेत त्यांनी त्यांचा चिमटा काढला.

राधानगरी विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार के पी पाटील हे सलग चारवेळा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामध्ये दोनवेळा ते विधानसभा सदस्य राहिले आहेत. तर सलग दोनवेळा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आहे. सातत्याने राजकीय बदलाची भूमिका त्यांच्या अंगलट आली आहे. त्यामुळे मतदारसंघातील जनतेत रोष आहे. त्याचा अंदाज बहुदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आला असावा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com