Two thousand Rupee Note Sarkarnama
देश

RBI on 2000 Note Demonetize : दोन हजारांच्या नोटांचे भारतीय चलनात सध्या केवळ अडीच लाख कोटी रुपये !

RBI Announcement Today : काळा पैसा नष्ट करण्यासाठी मोठी मदत

सरकारनामा ब्यूरो

RBI on 2000 Note : देशात २०१६ च्या बंदीवेळी एक हजार आणि पाचशेच्या नोटा ८५ टक्के भारतीय चलनात होत्या. नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय चलनात मोठी तूट निर्माण झाली होती. ती चलनतूट कमी वेळेत भरून काढण्यासाठी दोन हजार रुपयांची नोट व्यवहारात आणली होती. सध्या दोन हजार रुपयांच्या स्वरुपातील चलन अंदाजे अडीच लाख कोटी रुपये आहेत. तेच सरकार जमा करणार असल्याची माहिती अर्थतज्ज्ञ, ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर यांनी सांगितले.

मालकर यांनी 'सरकारनामा लाइव्ह'मध्ये बोलताना दोन हजार रुपयांच्या नोटबंदीचे स्वागत केले. तसेच सध्या सरकारला किती रुपये जमा करून घ्यायचे आहेत, याचाही उहापोह केला. मालकर म्हणाले, "चलनातून एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटाबंद केल्यानंतर दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली होती. त्यावेळी सहा लाख कोटी रुपयांचे चलन दोन हजार रुपयांच्या स्वरुपात होते. दरम्यान, सरकारने गेल्या तीन-चार वर्षांपासून दोन हजार रुपयांची नोट चलनातून कमी करण्यास सुरूवात केली. सध्या चलनात साधारणतः अडीच लाख कोटी रुपयेच दोन हजार रुपयांच्या स्वरुपात आहे. आता चलनातील शंभर, दोनशे आणि पाचशे रुपयांच्या नोटांचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही."

ही नोटबंदी नैसर्गिक असल्याचेही मालकर यांनी यावेळी सांगितले. मालकर म्हणाले, "२०१६ मध्ये नोटबंदी केल्यानंतर चलनात दोन हजारांची नोट आणली होती. ही नोट चलनात जास्त काळ राहणार नाही, असेही सरकारने त्यावेळी स्पष्ट केले होते. त्यानुसारच आजचा निर्णय घेतला आहे. आता दोन हजार रुपयांची नोट चलनातून बंद करून २०१६ ची नोटबंदी पूर्ण झाली आहे. त्यामुळे ही नोटबंदी नैसर्गिकच आहे." (RBI Announcement)

दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद केल्यामुळे काळा पैशा नष्ट होईल, मनी लॉड्रिंगसारख्या प्रकारांना आळा बसेल, बनावट नोटा बंद होतील, आर्थिक रसद बंद झाल्याने दहशतवाद्यांना झटका बसण्यास मदत होणार असल्याचेही मालकरांनी यावेळी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT