Jharkhand News  Sarkarnama
देश

Assembly Election : एकाही पक्षाला स्वबळावर गाठता आला नाही बहुमताचा जादुई आकडा; समजून घ्या सत्तेचं गणित...

Jharkhand Assembly Elections 2024 Trends and Elections History : झारखंड पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामुळे राज्याचा भूतकाळात राजकीय स्थिती कशी होती. हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Rashmi Mane

Jharkhand News : बिहारपासून वेगळे होऊन अस्तित्वात आलेल्या झारखंड राज्याला 24 वर्षे पूर्ण झाली. या काळात राज्यात 4 वेळा विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. 24 वर्षात राज्यातील जनतेने 13 मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पाहिला आहे. एवढेच नाही तर तीन वेळा राष्ट्रपती राजवटही लागू करण्यात आली आहे. तर एक अपक्ष आमदार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान होताना पाहिले आहे.

झारखंडचे नाव येताच राजकीयदृष्ट्या अस्थिर राज्याचे चित्र दिसते. पण या अस्थिरतेमागे काय कारण आहे? अजूनही झारखंडमध्ये कोणताचं राजकीय पक्ष बहुमतासाठी आवश्यक असलेला 41 चा जादूई बहुमताचा आकडा गाठू शकला नाही. झारखंडमध्ये आतापर्यंत चार निवडणुका पार पडल्या आहेत. यावेळेसही हे राज्य पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहे. अशातच झारखंड राज्याचा भूतकाळात राजकीय स्थिती कशी होती. हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

झारखंडमध्ये आतापर्यंत कोणत्याही पक्षाला बहुमत नाही

झारखंड मधील अस्थिरतेमागे राज्यातील सत्तेचे असणारे अंकगणित कारणीभूत आहे. झारखंड विधानसभेची एकूण सदस्य संख्या 81 आहे. 81 सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी आवश्यक असलेला जादूई आकडा 41 जागेचा आहे. हा आकडा लहान आहे, पण झारखंडमध्ये निवडणूक लढवणाऱ्या पक्षांसाठी ही संख्या कमी नाही. हा जादूई आकडा मिळवण्यासाठी आतापर्यंत सर्वच पक्ष अपयशी ठरले आहेत. आतापर्यंत झालेल्या चार विधानसभा निवडणुकींमध्ये हा आकडा कोणत्याही पक्षाला गाठता आलेला नाही. झारखंड निवडणुकीत 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाने 37 विधानसभा जागा जिंकल्या आणि राज्याच्या निवडणूक इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. पण त्यांनाही बहुमताचा आकडा पार करता आला नव्हता.

एका निवडणुकीत चार पक्ष दहा बहुमताच्या आकड्या पुढे पोहोचले होते

झारखंडमधील निवडणुकीचा इतिहासात पहिल्यांदाच 2009 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 18 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसने (Congress) 14 जागा जिंकल्या आणि झारखंड विकास मोर्चाने (जेव्हीएम) 11 जागा जिंकल्या. 2009 च्या विधानसभा निवडणुकीतच तीनपेक्षा जास्त पक्षांच्या जागा दुहेरी आकड्यापर्यंत पोहोचू शकल्या होत्या. त्यामुळे आतापर्यंत फक्त 2009 राज्यात एकाच निवडणुकीत असे घडले आहे. जेव्हा चार पक्षांनी 10 किंवा त्याहून अधिक जागा जिंकल्या होत्या.

या निवडणुकीतील राजकीय चित्र काय?

झारखंडच्या (Jharkhand) या निवडणुकीतील इतिहास पाहून प्रत्येक पक्ष सतर्क झाला असून त्यानुसार रणनीती ठरवून पक्षांनी आधीच छोट्या पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. भाजपने सुदेश महतो यांच्या नेतृत्वाखालील ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन (AJSU) तसेच नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (युनायटेड) आणि चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांच्याशी युती केली आहे.

त्याचवेळी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि डावे पक्ष सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चासोबत आहेत. भाजप आणि झारखंड मुक्ती मोर्चा या दोन्ही प्रमुख पक्षांनी निवडणुकींनंतर सरकार स्थापनेची कसरत करण्यापेक्षा निवडणुकीपूर्वीच छोट्या व्होट बँकांना लक्ष्य करून युती केली. आता हे युतीचे गणित कोणासाठी किती अनुकूल ठरते हे 23 नोव्हेंबरची तारीखच सांगेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT