Jyotiraditya Scindia And Amitabh Bachchan sarkarnama
देश

Jyotiraditya Scindia : 'हो, तो आवाज मलाही इरिटेट करतो'; केंद्रीय मंत्र्यांचा बच्चन यांच्या आवाजाच्या कॉलर ट्यूनवर संताप

Jyotiraditya Scindia ON Cyber ​​Fraud Caller Tune in Amitabh Bachchan's voice : देशभरात सायबर फसवणूक टाळण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या आवाजात कॉलर ट्यून बनवण्यात आली आहे. जी फोन लावण्याच्याआधी सुनावली जाते. पण आता कॉलर ट्यून थांबवण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.

Aslam Shanedivan

Indore News : देशाच्या कोणत्या कोणत्या कोपऱ्यात सध्या सायबर फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे. ही फसवणूक थांबवण्यासाठी केंद्र सरकारकडून जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून बनवण्यात आली आहे. जी फोन लागण्याआधी मोबाईलवर ऐकण्यात येते. पण याचा ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. यावरून भाजप नेत्याने ती बंद करण्यात यावी अशीच मागणी केद्रीय मंत्र्याकडे केलीय. यावेळी त्या मंत्र्याने देखील याचा आपल्यालाही त्रास होत असल्याचे सांगितल्याने आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर ही कॉलर ट्यून बंद होणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यावेळी यावेळी खासदार शंकर लालवाणी, मंत्री तुलसी सिलावत, महापौर पुष्यमित्र भार्गव, आमदार मधु वर्मा, जिल्हाध्यक्ष श्रवण सिंह चावडा, माजी आमदार संजय शुक्ला, दीपक जैन टिनू आणि इतर नेते उपस्थित होते.

भाजप नेते माजी आमदार सुदर्शन गुप्ता यांनी शुक्रवारी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan’s Caller Tune) यांच्या आवाजात मोबाईलमध्ये वाजणाऱ्या कॉलर ट्यूनबद्दल तक्रार केली. गुप्ता यांनी मंत्री सिंधिया यांना सांगितले की, जेव्हा आपत्कालीन कॉल केला जातो तेव्हा कॉलच्या सुरुवातीलाही अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकू येतो. ज्यामुळे विशेषतः वृद्ध, रुग्ण आणि व्यापारी वर्गातील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ती बंद कारावी. या मागणीसाठी गुप्ता यांनी सिंधिया यांना मागणीचे निवेदनही दिले.

यावेळी सिंधिया यांनीही यावर सहमती दर्शवत, हे खरे आहे, मलाही याचा त्रास होत असल्याची कबूली दिली. तसेच सायबर फसवणूक आणि डिजिटल फसवणुकीविरुद्ध जनजागृती करण्यासाठी भारत सरकारकडून एक विशेष मोहीम राबविली जात आहे, ज्याअंतर्गत मोबाईल कॉलच्या सुरुवातीला कॉलर ट्यून वाजवली जाते. या कॉलर ट्यूनचा उद्देश वापरकर्त्यांना ओटीपी, बँक तपशील किंवा इतर वैयक्तिक माहिती शेअर करू नये अशी चेतावणी देणे आहे. पण यामुळे सामान्य ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचेही सिंधिया यांनी आता मान्य केलं आहे.

...इतर माध्यमांचा वापर

गुप्ता यांनी सिंधिया यांना निवेदन सादर केले आणि ही कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी केली आहे. निवेदनात गुप्ता यांनी, कॉलर ट्यून वाजल्याने मोबाईल कॉलमध्ये वारंवार व्यत्यय येतो. ज्यामुळे कॉल ड्रॉप, कनेक्टिव्हिटी समस्या आणि कॉलिंगमध्ये विलंब होत आहे. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत ही समस्या गंभीर होत आहे आणि ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जरी डिजिटल अटक सारख्या जागरूकता मोहिमा आवश्यक आहेत, परंतु या कॉलर ट्यूनऐवजी याची माहिती एसएमएस, सोशल मीडिया, टीव्ही-रेडिओ किंवा इतर प्रचारात्मक माध्यमांद्वारे प्रसारित केल्या पाहिजेत. जेणेकरून जागरूकता आणि सुविधा यांच्यात संतुलन राहील.

...अनेक तक्रारी आल्या

यावेळी सिंधिया यांनी गुप्ता यांची तक्रार योग्य मानली असून या विषयावर अनेक ग्राहकांनी यापूर्वीही तक्रार केली आहे. त्यांनी आश्वासन दिले की या विषयावर त्वरित कारवाई केली जाईल आणि विभागीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या जातील.

विमानतळावरच घडली मजेदार घटना

दरम्यान इंदूर विमानतळावर एक मजेदार घटना देखील पाहायला मिळाली, गुप्ता यांनी निवेदन दिल्यानंतर त्यावर सिंधिया यांना सही करायची होती. पण निवेदन धरण्यासाठी आधार नव्हता. यावेळी त्यांनी गुप्ता यांना पाठमोरं उभा करत त्यांच्या पाठीवरच निवेदनावर सही केली. यावर उपस्थितांत खसखश पिकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT