CM Siddaramaiah Vs DK Shivakumar Sarkarnama
देश

CM Siddaramaiah Vs DK Shivakumar : डीके शिवकुमार यांचा 'GAME'; सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची वाचवू शकणार का?

Karnataka Congress BR Patil resignation : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे राजकीय सल्लागार वरिष्ठ नेते बीआर पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Mayur Ratnaparkhe

Karnataka Congress Crisis : कर्नाटकात काँग्रेस सरकारवरील राजकीय संकट अधिकच गडद होताना दिसत आहे. कारण, प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी मोठा 'GAME' केला आहे. त्यामुळे आता असेही प्रश्न उपस्थित होवू लागले आहेत, की मुख्यमंत्री सिद्धरामय्या अशा परिस्थितीत त्यांचं मुख्यमंत्रिपद अजून किती दिवस वाचवू शकतात.

खरंतर राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसची(Congress) परिस्थिती आधीच बिकट झालेली आहे. संपूर्ण देशभरात काँग्रेस केवळ तीन राज्यात सत्तेवर आहे. त्यापैकी सर्वात मोठं राज्य कर्नाटक आहे. याशिवाय तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यात काँग्रेसचे सरकार आहे. परंतु, 2023च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या विजयापासूनच मुख्यमंत्रिपदावरून पक्षांतर्गत वाद उफाळल्याचे दिसून आले आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार(DK Shivakumar) यांच्यातील हा वाद जगजाहीर आहे. अखेर केंद्रीय नेतृत्वाच्या हस्तक्षेपानंतर राज्यात सत्तेच्या वाटपाचा फॉर्म्यूला निश्चित झाला होता. डीके शिवकुमार गटाकडून दावा केला जात आहे की, अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असा फॉर्म्यूला ठरला होता आणि याचमुळे मागील काही दिवसांपासून डीके शिवकुमार गट वारंवार अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रिपदावर दावा सांगताना दिसत आहे.

याच दरम्यान ताजी माहिती ही समोर आली आहे की, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे(CM Siddaramaiah) राजकीय सल्लागार वरिष्ठ नेते बीआर पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. पाटील यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गटाचे नेते मानले जाते. शिवाय ते सिद्धरामय्यांचे निकटवर्तीयही मानले जातात. परंतु राज्यात काँग्रेस अनेक गटातटात विभागलेली असल्याने त्यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले नाही. मागील महिन्यातच सिद्धरामय्या गटाच्या नेत्यांनी एक डिनर पार्टी केली होती. यानंतर येथे नवे राजकीय संकट निर्माण झाले.

एका वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार सूत्रांचा दावा आहे की, पाटील यांचा राजीनामा हा सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यातील वादाचा परिणाम आहे. पाटील हे कलाबुरगी जिल्ह्यातील अलांद या मतदारसंघातून चारवेळा आमदार झालेले आहेत. त्यांनी सरकार आणि पक्षाला योग्य महत्त्व न मिळाल्याने राजीनामा दिला आहे. या क्षेत्रात डीके शिवकुमार यांचा काही खास प्रभाव नाही. कलाबुरगी हा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा भाग आहे. येथूनच खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे हे आपल्या वडिलांचा राजकीय वारसा चालवत आहेत. परंतु पाटील आणि प्रियांक खर्गे यांच्यातील संबंध फारसे खास नाहीत. हेच कारण आहे की, एक वरिष्ठ नेते असूनही सिद्धरामय्या सरकारमध्ये पाटील यांना स्थान मिळाले नाही.

राजीनाम्याच्या वृत्ताने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले की, ते याबाबत पाटील यांच्याशी बोलतील. खरंतर कलाबुरगी येथे प्रियांक यांचा प्रभाव कायम वाढत आहे. यामुळेच मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असूनही पाटील यांना ते साइडलाइन होत असल्याचं वाटत आहे. खरंतर 2023मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर पाटील यांना मंत्री बनवलं जाईल असं बोललं जात होतं. परंतु कलाबुरगी येथून प्रियांक आणि अन्य एका आमदारास मंत्रिपदाची लॉटरी लागली. या ठिकाणी सिद्धरामय्यांची काहीही चाललं नाही.

यानंतर मग मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाटील यांना आपले राजकीय सल्लागार बनवले. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार पाटील सरकार आणि प्रशासनात आपल्या मर्यादित भूमिकेमुळे नाराज होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या देखील त्यांच्याशी काही खास राजकीय सल्लामसलत करत नव्हते. आता पाटील यांच्या राजीनाम्यामुळे कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत कलह अधिकच स्पष्टपणे समोर आला आहे. आता पक्ष काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT