India Alliance  Google
देश

India Alliance : ‘इंडिया’मध्ये नेत्यांची 'दादागिरी'; एकमेकांच्या औकातीवर घसरले

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे नेते आक्रमक...

Rajanand More

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी 'इंडिया' आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याबाबतीत आघाडीतील नेते दावे-प्रतिदावे करत आहेत. तर काही नेते थेट औकातीवर येऊ लागल्याने 'इंडिया' आघाडीमध्ये सगळे काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लोकसभेचा विजय तर दूरच पण जागावाटपाचा तिढा सोडवताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांनी राज्यात केवळ आपलाच पक्ष भाजपला (BJP) टक्कर देऊ शकतो, असे म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेस (Congress) किंवा डाव्या पक्षांच्या पदरात जागावाटपादरम्यान काहीच पडणार नाही, असे संकेतच त्यांनी दिले आहेत. त्यातच तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते कुणाल घोष यांनी डाव्या पक्षांची औकात काढली आहे.

पश्चिम बंगालमध्ये आता डावे नाही. त्यांना 'टीएमसी'सोबत बसण्याचाही अधिकार नाही, असा टोला घोष यांनी लगावला आहे. 'इंडिया' आघाडी देशात भाजपविरोधात लढेल, तर बंगालमध्ये तृणमूल आणि भाजप अशी लढाई होईल, असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केल्याचे घोष यांनी सांगितले. आम्ही 2021 मध्ये भाजपला पराभूत केले आहे, अशी आठवणही त्यांनी करून दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2021 च्या निवडणुकीत काँग्रेस आणि सीपीआय (एम) यांना एकही जागा मिळालेली नाही. उलट मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला. जागावाटपाचा अंतिम निर्णय ममता बॅनर्जी घेतील. राज्यात इतर कुणी उरलेले नाही. डाव्यांची 'टीएमसी'सोबत बसण्याची औकात नाही, अशी टीका घोष यांनी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील जागावाटपावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये दावे-प्रतिदावे केले जात आहेत. काँग्रेसला शून्यापासून सुरूवात करावी लागेल, असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना पक्षफुटीची आठवण करून दिली आहे. केंद्रीय पातळीवरच राज्यातील जागावाटपावर चर्चा होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT