Loksabha Election 2024 Sarkarnama
देश

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर; पंतप्रधान मोदी अन् खर्गेंचीही आली प्रतिक्रिया, म्हणाले...

Mayur Ratnaparkhe

Lok Sabha Election 2024 updates : . निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. यानुसार मुख्य निवडणूक आयुक्त (Election Commissioner) राजीव कुमार यांनी शनिवारी दुपारी तीन वाजता निवडणूक आयुक्त एस. एस. सिंह आणि ज्ञानेश कुमार यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यात देशात 19 एप्रिल ते 1 जून अशा 7 टप्प्यांत मतदान होणार आहे.

लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. आज (16 मार्च)पासून आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर होताच, त्यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान मोदी(PM Modi) म्हणाले, 'लोकशाहीच्या सर्वात मोठ्या महापर्वाचा शुभारंभ झाला आहे. निवडणूक आयोगाने 2024 तारखांची घोषणा केली आहे. भाजप- एनडीए या निवडणुकीत उतरण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. सुशासन आणि जनसेवेच्या आपल्या ट्रॅक रेकॉर्डच्या आधारावर आम्ही जनतेत जाऊ. मला विश्वास आहे की, 140 कोटी कुटुंबीय आणि 96 कोटींपेक्षाही अधिक मतदारांचा भरपूर स्नेह आणि आशीर्वाद आम्हाला सलग तिसऱ्यांदा मिळेल.'

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे(Mallikarjun Kharge) म्हणाले, '2024 लोकसभा निवडणूक भारतासाठी न्यायाचे द्वार उघडेल. लोकशाही आणि संविधानास तानाशाहीपासून वाचवण्याची कदाचित ही शेवटची संधी असेल. आपण सर्व भारतीय एकजुटीने द्वेष, लूट, बेरोजगारी, महागाई आणि अत्याचाराच्या विरोधात लढू, असं म्हणत शेवटी 'हाथ बदलेगा हालात'.

आज (16 मार्च)पासून आचारसंहिता लागू झाली आहे. पहिला टप्पा सर्वात मोठा असून, एकाच दिवशी 22 राज्यांत मतदान होणार आहे. त्यामुळे हा टप्पा सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर, छत्तीसगड आणि आसाममध्ये पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. 
(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

SCROLL FOR NEXT