Madhya Pradesh Assembly Sarkarnama
देश

Assembly Winter Session : विधानसभेतून नेहरूंचा फोटो हटवून आंबेडकरांचा लावला; भाजप-काँग्रेस आमनेसामने

Rajanand More

Madhya Pradesh Assembly : मध्य प्रदेशात नवीन सरकारच्या पहिल्याच विधिमंडळ अधिवेशनात वादाची ठिणगी पडली आहे. विधानसभेतून दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो हटवण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. नेहरूंच्या फोटोच्या जागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यावरून काँग्रेस आणि सत्ताधारी भाजप आमनेसामने उभे ठाकले आहेत.

मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांचे पुत्र व काँग्रेसचे (Congress) नेते जयवर्धन सिंह यांनी भाजपवर (BJP) आरोप केले आहेत. अध्यक्षांच्या आसनामागील बाजूस नेहरूंचा फोटो होता. हा फोटो भाजप किंवा इतर कुणीही हटवला असेल तर ते चुकीचे आहे. देशाच्या लोकशाहीचा पाया नेहरूंमध्ये मजबूत आहे. हंगामी अध्यक्ष गोपाळ भार्गव यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित करणार आहोत, असे सिंह यांनी सांगितले.

नेहरूंच्या फोटोच्या जागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते उमंग सिंगार म्हणाले, ‘भाजपकडून येत्या काळात आंबेडकरांचा फोटो हटवून तिथे नथुराम गोडसेचा फोटो लावला जाईल. नेहरूंचा फोटो हटवला हा महत्त्वाचा मुद्दा नाही. पण ते नेहरूंचे विचार मिटवू पाहत आहेत.’ काँग्रेसचे हे आरोप हंगामी अध्यक्ष गोपाळ भार्गव यांनी फेटाळून लावले आहेत. मागील सरकारच्या काळातच हे घडले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भार्गव यांनी सांगितले की, ‘मी याबाबत कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. नेहरू आणि आंबेडकर हे थोर नेते आहेत. सर्वांबाबत सन्मानाची भावना आहे. विधिमंडळाच्या सचिवालयांतर्गत एक विशेष समिती असून या समितीकडे या मुद्दा पाठविला जाईल. त्यानंतर आवश्यक निर्णय घेतला जाईल.’ नेहरूंचा फोटो योग्य जागी लावण्याबाबत सचिवालय निर्णय घेईल, असे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांनी म्हटले.

विधिमंडळात आंबेडकरांचा फोटो लावला असेल तर त्याचे स्वागतच आहे. काँग्रेसने त्यामुळे असे बोलू नये. डॉ. आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार आहेत. त्यांचा फोटो विधिमंडळात असायलाच हवा, असेही शुक्ला म्हणाले. आंबेडकरांसोबत नेहरूंचा फोटोही विधिमंडळात हवा, अशी मागणी आमदार राजेंद्र भारती यांनी केली आहे.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT