Congress : गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का; आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी, संख्याबळ 16 वर

MLA Chirag Patel : चिराग पटेल यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी...
MLA Chirag Patel Resigns
MLA Chirag Patel ResignsSarkarnama
Published on
Updated on

Gujarat News : लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी विरोधकांना धक्के बसण्यास सुरूवात झाली आहे. आठवडाभरापुर्वीच गुजरातमध्ये आम आदमी पक्षाच्या आमदाराने राजीनामा दिला होता. हे सत्र सुरूच असून मंगळवारी काँग्रेस आमदाराने राजीनामा दिल्याने गुजरातच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. या राजीनाम्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ आता १६ वर घसरले आहे.

काँग्रेसचे आमदार चिराग पटेल (Congress MLA Chirag Patel) यांनी मंगळवारी सकाळी विधानसभेचे अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे राजीनामा सोपवला. राजीनामा देण्याच्या एक तास आधी त्यांनी आपण काँग्रेसमध्ये (Congress) राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. पटेल हे खंबात विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी वर्षभरापुर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे (BJP) तत्कालीन आमदार मयूर रावल यांचा पराभव केला होता. पटेल हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

MLA Chirag Patel Resigns
Lok Sabha Winter Session : सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह 49 खासदार निलंबित

विधानसभेच्या निवडणुकीत (Assembly Election) काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता. काँग्रेसला केवळ १७ जागांवर विजय मिळवता आला होता. आता एका आमदाराने राजीनामा दिल्याने केवळ १६ आमदार उरले आहे. आणखी आमदार तसेच पदाधिकारी राजीनामा देणार असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. हे सर्वजण भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना चिराग पटेल यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यामागे अनेक कारणे आहेत. काँग्रेसची विचारधारा ही देशविरोधी आहे, हे प्रमुख कारण आहे. पक्षातील नेत्यांचा सकारात्मक दृष्टीकोन नाही, असे सांगत पटेल यांनी राजीनाम्याचे समर्थन केले.

MLA Chirag Patel Resigns
Supriya Sule Suspended : भाजप खासदाराच्या पासवर संसदेत घुसखोरी, चर्चा का नको? निलंबनानंतर सुप्रिया सुळे कडाडल्या...

चिराग पटेल हे उद्योजक आहेत. प्रामुख्याने राजस्थानमध्ये त्यांनी व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये झालेले सत्तापरिवर्तनाला त्यांच्या राजीनाम्याशी जोडले जात आहे. आनंद जिल्ह्यातील ते काँग्रेसच्या दोन आमदारांपैकी एक होते. आता या जिल्ह्यात काँग्रेसकडे अमित चावडा हे एकमेव आमदार उरले आहेत.

(Edited By - Rajanand More)

MLA Chirag Patel Resigns
Sharad Pawar News: खासदारांचे निलंबन हे खेदजनक...; पवारांचे उपराष्ट्रपतींना पत्र

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com