Lok Sabha Winter Session : सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह 49 खासदार निलंबित

Parliament : निलंबित खासदारांचा आकडा १४१ वर पोहचला.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Parliament Winter Session 2023 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सलग दुसऱ्या दिवशी लोकसभेतील घुसखोरी प्रकरणाचा मुद्दा गाजला. विरोधकांनी मंगळवारी लोकसभेत घातलेल्या गोंधळामुळे सरकारकडून 49 खासदारांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, काँग्रेसचे शशी थरूर यांच्यासह ४९ खासदारांना निलंबित करण्यात आले.

अधिवेशन काळासाठी या खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. सोमवारपर्यंत एकूण 92 खासदारांना लोकसभा व राज्यसभेतून निलंबित केले गेले आहे. आता लोकसभेतून आणखी 49 खासदारांची त्यात भर पडली आहे. त्यामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. इतिहासात पहिल्यांदाच दोन दिवसांत 141 खासदारांना निलंबित करण्याची घटना घडल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे.

Supriya Sule
PM Narendra Modi : काही म्हातारे, आजारी नेते भाजपला हरवण्यासाठी सक्रिय!

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत (Lok Sabha) 13 डिसेंबर रोजी घुसखोरीची घटना घडली. त्यानंतर विरोधकांनी दोन्ही सभागृहात या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी लावून धरली आहे. तसेच याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दोन्ही सभागृहात भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी विरोधकांकडून दोन्ही सभागृहात आवाज उठवला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निलंबित खासदारांमध्ये सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, डिम्पल यादव. मनिष तिवारी, शशी थरूर, कार्ती चिदंबरम, दानिश अली आदींचा समावेश आहे. सोमवारी अधीर रंजन चौधरी यांच्यासह 33 जणांना निलंबित करण्यात आले आहे. अधिवेशन आणखी तीन दिवस चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तीन दिवसांत आणखी खासदारांचे निलंबन होऊ शकते, अशी चर्चा विरोधकांमध्ये आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन दिल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे विरोधी खासदारांनी स्पष्ट केले आहे.

(Edited By - Rajanand More)

Supriya Sule
Gyanvapi Case : उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मुस्लीम पक्षकारांच्या सर्व याचिका फेटाळल्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com