Sambhajiraje Chhatrapati Sarkarnama
देश

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचा पुढाकार; दिल्लीत बोलावली खासदारांची बैठक

Sambhajiraje Chhatrapati: या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात काय चर्चा होणार ?

Ganesh Thombare

Delhi News: गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला असतानाच शुक्रवारी पुन्हा नवा अल्टिमेटम देत आरक्षणासंदर्भात सरकारने आतापर्यंत काय-काय पावलं उचलले ते 17 तारखेपूर्वी सांगावं, अन्यथा आम्ही आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार असल्याचा इशारा दिला.

यातच आता संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासंदर्भात दिल्लीत सर्व लोकसभा व राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून शरद पवार, नितीन गडकरी, नारायण राणे यांच्यासह अजून काही खासदारांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये 18 डिसेंबरला ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी संसदेत आवाज उठवावा, यासाठी ही बैठक घेतली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी स्वतः पुढाकार घेत काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मागासवर्गीय आयोगाची भेट घेतली होती. तसेच त्या भेटीत कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यात आली होती. यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात थेट दिल्लीत बैठक बोलवली आहे. त्यामुळे या बैठकीला कोण-कोण हजर राहतं, तसेच या बैठकीत काय चर्चा होते, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची त्यांची मागणी आहे. यावरूनच मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता राज्य सरकारला जरांगे पाटलांनी नवा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे सरकार काय भूमिका घेतं, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT