Nitesh Rane News : मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत सातत्याने टिका करणारे भाजपचे आमदार नीतेश राणे यांना धुळ्याच्या कार्यकर्त्यांनी उत्तर दिले आहे. राणे यांना भाजपमध्ये किंमत नसल्याने त्यांची लुडबूड करीत असल्याची टिका करीत त्यांचा निषेध केला आहे. (Maratha workers criticized BJP MLA Nitesh Rane for his anti reservation role)
भाजपचे (BJP) आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर टिका केली होती. तसेच मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर देखील टिका केल्याने धुळे (Dhule) येथे त्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
आमदार राणे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी संवर्गातून आरक्षण द्यायला तीव्र विरोध आहे. राज्य सरकारने तसा निर्णय घेवू नये. तसे आरक्षण दिले तर मराठा ही जात शिल्लक राहणार नाही. तसेच मराठा समाजाला ‘कुणबी’तून सरसकट आरक्षण मागणारे जरांगे- पाटील कोण, कुठले आले..?, असे त्यांच्याविषयी एकेरी उल्लेख करीत विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सांगतिले होते. त्यांच्या या विधानाचा जिल्हा सकल मराठा समाजातर्फे निषेध करण्यात आला.
मराठा आरक्षणप्रश्नी सकल मराठा समाजातर्फे येथील क्युमाईन क्लबजवळ साखळी उपोषण सुरू आहे. त्यात आमदार राणे यांनी वादग्रस्त विधान केल्याने मराठा समाजाच्या भावना दुखावल्याचे सांगत त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून जिल्हा सकल मराठा समाजाने साखळी उपोषणस्थळी आंदोलन केले.
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी मनोज जरांगे- पाटील यांना डिवचू नये. मराठा समाज शांततेसह संयमाने आंदोलन करीत आहे. त्यांचा अंत बघू नये, असेही आंदोलक म्हणाले. यावेळी समन्वयक सुधाकर बेंद्रे, भानुदास बगदे, विनोद जगताप, निंबा मराठे, हरिशचंद्र वाघ, राजेंद्र काळे, संदीप पाटोळे, दीपक रौंदळ यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.