PM Modi Sarkarnama
देश

PM Modi : युद्ध थांबवणाऱ्या पंतप्रधान मोदींना कोलंबियाने जे केलं ते का जमलं नाही? गुन्हेगारासारखी वागणूकीवर सरकार गप्प का?

US Deportation : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच अवैध स्थलांतरितांवर कडक कारवाईचे संकेत दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या प्रवासी भारतीयांना अमेरिकेच्या लष्करी विमानाने परत पाठविले. पण यावेळी भारतीयांना जी वागणूक देण्यात आली. त्यावरून आता जोरदार वाद सुरू झाला आहे. यावरून सोशल मिडियावर देखील आगपाखड केली जातेय.

Aslam Shanedivan

Pune News : देशाचे पंतप्रधान स्वत:ला 56 छातीचे म्हणवून घेतात. तर त्यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात महत्त्वाची बजावलल्याचे अनेकदा भाजप छाती फुगवून सांगतात. पण अमेरिकेनं ज्या पद्धतीने भारतीयांना वागणूक दिली आहे. त्यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. यावरून काँग्रेससह विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच सोशल मिडियावर देखील आता थेट मोंदीनाच सवाल केला जातोय. अनेकांनी मोदी जर रशिया-युक्रेन युद्ध थांबवू शकतात ते आपल्या देशवासियांवर अशी वागणूक दिल्यानंतर कसे गप्प राहू शकतात. एका विदेशी विमानाला परवानगी नसताना कसे काय लॅडिंग करता येऊ शकते असे आता प्रश्न देशवासीय करतायतं. तर आता हे सरकार गप्प का? असाही प्रश्न विचारला जातोय.

अमेरिकेत नुकसाच निवडणुक पार पडली असून डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे आपल्या हाती घेतली आहेत. यावेळी त्यांनी अवैध स्थलांतरितांवर कडक कारवाई करण्याचे संकेत देताना पहिलाच दणका भारताला दिला आहे. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 104 भारतीयांना बुधवारी (ता.5) भारतात परत पाठवले आहे. या भारतीयांना अमेरिकेचे सी-17 हे लक्षरी विमान अमृतसरमधील श्री गुरू रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.

ज्या भारतीयांना माघारी सोडले त्यांना कैद्यांसारखी वागणूक देण्यात आल्याचे आता समोर आले आहे. यावरूनच भारतीयांचा पारा चढला आहे. या प्रवाशांना हातात आणि पायात कैद्यांप्रमाणे बेड्या घालण्यात आल्या होत्या. टेक्सासमधील सॅन अँटोनिया येथून आलेल्या या विमानात 104 भारतीय होते. ज्यात पंजाबमधील 30, हरियाणा आणि गुजरातमधील 33, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी तीन आणि चंदीगडमधील दोघांचा समावेश आहे. यासर्वांवर बेकायदेशीर स्थलांतरितांविरूद्धाची कारवाई करण्यात आली आहे.

गंगाविहारचा आनंद घेताना हे दिसंल नाही?

याच मुद्द्यावरून जेष्ठ पत्रकार एस एम देशमुख यांनी एक पोस्ट टाकत मोंदीसह केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. त्यांची हिच पोस्ट आता व्हायरलं होत असून अनेकांना सरकार गप्प का असा सवाल केला आहे. देशमुख यांनी, मोदी प्रयागराजला गंगेत पवित्र डुबकी घेत होते.. गंगाविहारचा आनंद घेत होते.. त्यांचा मागे अख्खा मिडिया धावत होता. डुबकी कशी घेतात याचं रसभरीत वर्णन करीत होता.. मात्र त्याचवेळी अमेरिकन लष्कराचं एक विमान अमृतसरच्या विमानतळावर लँन्ड होत होतं...

कोणताही स्वाभिमानी देश परकीय लष्करी विमानाला आपल्या भूमीवर उतरण्याची अनुमती देत नाही, हे सत्य असताना मात्र आपल्या भारतात हे घटलं. जे घडलं ते देशाच्या सार्वभौमत्वालाच आव्हान देणारं होतं. पण कोलंबियाने आपले सार्वभौमत्वाला आव्हान पेललं त्यांनी अमेरिकेचं घुसखोरी परतवून लावली. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो बाणेदारपणा दाखवत अमेरिकेचं लष्करी देशात उपरवू देणार नसल्याचे ठाम सांगत अमेरिकेने धमकीला भीक घातली नाही. आणि आपले आपले विमान पाठवून त्यांनी आपल्या नागरिकांना सन्मानाने मायदेशी आणले..

हा असतो राष्ट्रवाद.. हा असतो स्वाभिमान. पण आपण काय केलं..? हातात बेड्या ठोकलेल्या अवस्थेत, अत्यंत अपमानीत पध्दतीने 104 भारतीयांना अमेरिकेने आज आपल्या लष्करी विमानातून भारतात पाठवून दिलं.. आपण बेशरमपणे अमेरिकेच्या लष्करी विमानाला भारताच्या भूमीवर उतरण्याची परवानगी दिली.. का?कोलंबिया सारखा एक छोटा देश जो स्वाभिमान दाखवू शकतो, तसा स्वाभिमान भारताला का दाखवता आला नाही? या सगळ्या विषयावर मोदी मौन बाळगून का आहेत? मोदी का बोलले नाहीत? आणि आताही बोलत नाहीत? उलट ही बातमी भारतीयांना समजणार नाही याची काळजी घेतली गेलीय. जिथं विमान उतरलं तिकडं मिडियाला फिरू नये म्हणून प्रयागराज भेटीचा मुहूर्त मोदींना साधल्याची टीका देशमुख यांच्यासह आता समाजनमाध्यातून देशवासीय करत आहेत.

माझ्यासह देशवासियांचे दोन मुद्दे असून एक भारतीयांना परत आणण्यासाठी मोदी यांनी कोलंबिया प्रमाणे आपले विमान का पाठवले नाही? अन् दुसरी गोष्ट म्हणजे जंग जंग पछाडलयानंतर देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळयास मोदी यांना अमेरिकेने निमंत्रित का केलं नाही? तरीही मोदी ट्रम्प यांना आपले मित्र मानतात.. हरकत नाही.. पण पंतप्रधानांनी आपल्या मित्राला किमान भारतीयांना बेड्या ठोकून पाठवू नका, अशी विनंती का केली नाही? बरं नाही केली तर आतातरी अमेरिकेच्या या कृत्याबद्दल त्यांचा निषेध करण्याची हिंमत भारत दाखविणार आहे का? असाही सवाल आता केला जातोय.

संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ

याच मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला. अमेरिकेतून परत पाठवलेल्या भारतीय स्थलांतरितांच्या मुद्द्यावर सरकारकडून उत्तर विरोधक मागत असून महाकुंभ दुर्घटनेचा मुद्दाही उपस्थित केला आहे. अमेरिकेतून बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतात पाठवण्याच्या मुद्द्यावर काँग्रेस, समाजवादी पक्ष (सपा) आणि इतर काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संसदेच्या परिसरात निदर्शने केली. 'आम्ही देशाचा अपमान सहन करणार नाही' आणि 'मोदी सरकार मुर्दावाद' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या निषेधात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा, सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि इतर अनेक विरोधी नेते या निषेधात सामील झाले.

आमचे लोक गुन्हेगार नाहीत : शशी थरूर

दरम्यान, काँग्रेस खासदार आणि परराष्ट्र व्यवहार संसदीय समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी, अमेरिकेला बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना देशात परत पाठवण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु या लोकांना हातकड्या घालून आणू नये किंवा लष्करी विमानात आणू नये. लष्करी विमानांऐवजी नियमित व्यावसायिक उड्डाणाने पाठवले असते तर बरे झाले असते. आमचे लोक काही गुन्हेगार नाहीत. त्यांची चूक फक्त एवढीच आहे की हे लोक तुमच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे आलेत. आता जेव्हा तुम्ही त्यांना आमच्या देशात आणत आहात, तेव्हा त्यांना हातकडी लावण्याची गरज नसल्याचा दावा थरूर यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT