Jitin prasad.jpg Sarkarnama
देश

Modi Government Minister Accident : मोठी बातमी! मोदी सरकारमधील 'या' केंद्रीय मंत्र्यांचा अपघात, दोन कार एकमेकांना धडकल्या

Deepak Kulkarni

Jitin Prasasd News : केंद्रीय मंत्री आणि खासदार जितिन प्रसाद हे उत्तर प्रदेशातील मझोला येथे पूरसदृश्य स्थितीची पाहणी करण्यासाठी जात असताना त्यांचा वाहनांचा अपघात झाला. या अपघातात मंत्र्‍यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. पीलीभीतच्या दौऱ्यावर असताना बहरुआ गावाच्या परिसरात त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघाताची घटना घडली.

मोदी सरकारच्या (Modi Government) तिसर्‍या टर्ममधील मंत्री जितिन प्रसाद हे शनिवारी (ता.20) त्यांच्या लोकसभा मतदारसंघामधील नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना ही अपघाताची घटना घडली.त्यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट कारने अचानक ब्रेक दाबल्याने जितिन प्रसाद यांची गाडीही थांबली.

मात्र,पाठीमागच्या गाडीने प्रसाद यांच्या कारला धडक दिली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. जितिन प्रसाद यांच्यासह त्याचे शेफ आणि खासगी सचिव जखमी झाले आहेत.

या अपघातानंतर काहीवेळातच केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी अपघातस्थळी त्यांची अपघातग्रस्त कार सोडून दिली.त्यानंतर ते दुसऱ्या कारमध्ये बसून नियोजित कार्यक्रमासाठी पुढे रवाना झाले.

काय होता कार्यक्रम..?

केंद्रीय मंत्री (Central Minister) आणि खासदार जितिन प्रसाद हे त्यांच्या लोकसभा मतदारसंघात पोहोचले होते.त्यानंतर ते मझोला येथील पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी निघाले होते. मागील काही दिवसांपासून या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे.

या पावसामुळे परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांना पुराने वेढले आहे. त्या गावांमधील जनजीवन विस्कळीत झालं असून तिथे प्रशासन यंत्रणांचं युध्दपातळीवर बचावकार्य सुरू आहे. याच पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जितिन प्रसाद मझोला येथे निघाले होते.त्याचवेळी बहरुआ गावाजवळ त्यांच्या ताफ्यातील कारचा अपघात झाला.

खासदार जितिन प्रसाद यांच्या एका कारने रस्त्यात खड्डा आल्याने अचानक ब्रेक लावला. यामुळे मागे धावणाऱ्या तीन कार एकमेकांना धडकल्या. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. तसेच कुणीही गंभीर जखमी झालेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT