LIC Adani Investment .jpg Sarkarnama
देश

LIC Adani Investment: मोदी सरकारकडून LIC वर अदानी समूहात 33,000 कोटींच्या गुंतवणुकीसाठी दबाव? ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या अहवालानं खळबळ

Life Insurance Corporation of India News: भारत सरकारच्या मालकीची असलेली आणि देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीची अदानी समूहातील गुंतवणूक धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे 2023 मध्ये मोठी खळबळ उडाली होती.

Deepak Kulkarni

New Delhi News: भारत सरकारच्या मालकीची असलेली आणि देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीबाबत वॉशिंग्टन वृत्तपत्रानं केलेल्या गंभीर आरोपांनी खळबळ उडवली आहे. अमेरिकन वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या अहवालात सरकारने LIC वर अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये सुमारे 33,000 कोटी गुंतवण्यासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. या नव्या दाव्यामुळे पुन्हा मोदी सरकार (Modi Government) आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर विरोधकांकडून हल्लाबोल होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान,एलआयसीनं 'वॉशिंग्टन पोस्ट'चा दावा फेटाळून लावला आहे.

केंद्रातील मोदी सरकारकडून भारतीय जीवन विमा निगम (LIC)ला अदानी समूहात 33,000 कोटींची गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रातून करण्यात आला आहे. वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकन वृत्तपत्रानं शुक्रवारी(ता.24) प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनं देशभरात खळबळ उडवून दिली होती.

या रिपोर्टमध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी LIC ला अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास दबाव आणल्याचं म्हटलं आहे.एलआयसीच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून अदानी समूहाच्या कंपन्यांना आर्थिक आधार देण्याचा नियोजित प्लॅन होता.पण आता LIC नं हे सर्व दावे झुगारले आहेत. एलआयसीनं अदानी किंवा इतर कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी कुठलाही दबाव किंवा गोपनीय योजना प्रत्यक्षात नसल्याचं म्हटलं आहे.

आता एलआयसीकडून सोशल मीडियावर एका अधिकृत निवेदनाद्वारे हा दावा खोडून काढतानाच भूमिकाही स्पष्ट केली आहे. अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्टमध्ये करण्यात आलेले सर्व आरोप पूर्णपणे खोटे असून ते आधारहीन आणि वस्तुस्थितीला धरून नसल्याचाही दावा एलआयसीनं केला आहे. आमचे सर्व गुंतवणुकीचे निर्णय सखोल पडताळणीनंतर घेतले जात असल्याचंही कंपनीनं निवेदनात नमूद केलं आहे.

2023 मध्ये अमेरिका स्थित हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालानंतर अदानी समूहाला प्रचंड मोठे नुकसान सोसावे लागले होते.एकीकडे शेअर मार्केटमध्ये अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरत असतानाच दुसरीकडे मोठ्या करार हातातून सुटले जात होते.यातच आता भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच LIC ची अदानी समूहातील गुंतवणूक धोक्यात असल्याचं दावा करण्यात आल्यानं गुंतवणुकदारांची झोप उडाली होती.

भारत सरकारच्या मालकीची असलेली आणि देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीची अदानी समूहातील गुंतवणूक धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे 2023 मध्ये मोठी खळबळ उडाली होती. एलआयसीनं अदानी समूहातील कंपन्यांमध्ये 30,127 कोटींची गुंतवणूक केल्याची माहिती आहे. या गुंतवणुकीचे मूल्य 24 जानेवारी 2023 रोजी 81,268 कोटी रुपये इतके झाले होते. पण त्यावेळी अचानक अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाल्याचं दिसून आलं होतं. त्याचाच परिणाम त्यावेळी एलआयसीच्या गुंतवणुकीवरही दिसून आला होता.

ज्यावेळी अमेरिकेच्या हिंडनबर्ग अहवालानं भारतातील उद्योगविश्वातील मोठं प्रस्थ असलेल्या अदानी समूहावर गंभीर आरोप केले होते. त्यावेळी अदानी समूहाला याचा मोठा फटका बसताना त्यांच्या कंपन्यांचे शेअर्सही मोठ्या प्रमाणात कोसळले होते.

त्याचदरम्यान, LIC नं काही प्रमाणात अदानी समूहात गुंतवणूक केल्याची माहिती आहे.तसेच पुढे अदानी ग्रुपवरील आरोप निष्प्रभ ठरल्यानंतर शेअर्समध्ये मोठी वाढ झाली अन् LIC ला त्यातून मोठा आर्थिक नफा मिळाल्याचंही दिसून आलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT