Phaltan News: सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून ड्युटीवर असलेल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. आता पुन्हा एकदा आत्महत्येपूर्वी डॉक्टर तरुणीने आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासोबतच इंजिनिअर प्रशांत बनकर (Prashant Bankar) या तरुणावरही मानसिक छळाचा गंभीर आरोप केला होता. मात्र, आता प्रशांत बनकरला अटक केल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे.
मेडिकल ऑफिसर असलेल्या तरुणी आत्महत्येप्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत बनकरच्या बहिणीनं माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिला डॉक्टरबाबत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. यात प्रेमाचा अँगल समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून बनकर यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर पीडित डॉक्टर तरुणी भाड्याने राहत होती. बनकर यांची दोन्ही मुले बाहेर राहायची, त्यामुळे प्रशांतचे आई वडिलचं घरी असायचे.आरोपी प्रशांत बनकर हा आयटी इंजिनिअर असून तो पुण्यामध्ये नोकरीला आहे.
काही महिन्यांपूर्वी प्रशांत बनकरला डेंगू आणि मलेरिया झाला होता,तेव्हा त्याच्यावर डॉ.मुंडे यांनी उपचार केले. याचवेळी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत यांची ओळख झाली. स्वतः डॉक्टर तरुणीने त्याचा नंबर घेतला होता. यानंतर प्रशांत नोकरीसाठी पुण्यात गेल्यावरही पीडित तरुणीनं त्याला फोन करून प्रेमसंबंधाचा प्रस्ताव ठेवला होता, पण त्यानं तो नाकारला होता असा दावाही प्रशांत बनकरच्या बहिणीनं केला आहे.
प्रशांतच्या बहिणीनं पुढे फलटण येथे पीडित तरुणी ही बनकर यांच्या घरात भाड्यानं राहत असताना तिचे बनकर कुटुंबियांशी घरगुती आणि जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते.तसेच प्रशांतच्या आई वडिलांनीही या तरुणीला मुलीप्रमाणे सांभाळल्याचंही प्रशांतच्या बहिणीनं दावा केला.
दिवाळीआधी डॉक्टर तरुणीचं बीड येथील कुटुंब फलटण येथे बनकर कुटुंबियांना भेटायला आले होते. त्यावेळी आमच्या गाडीतून त्यांच्या कुटुंबासह शिंगणापूर येथे देवदर्शनाठी गेल्याचंही प्रशांतच्या बहिणीनं सांगितलं.प्रशांतने नकार दिल्यानंतरही डॉक्टर तरुणी वारंवार त्याला संपर्क करत होती. पण प्रशांतनं तिला इग्नोर करत होता,असंही त्या म्हणाल्या.
मयत पीडित ड़ॉक्टर तरुणी प्रशांतला प्रेमासाठी टॉर्चर करत होती.या घटनेपर्यंत तरुणीनं प्रशांतला केलेले सर्व मेसेजचे पुरावे पोलिसांना दिल्याची माहितीही बनकर कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. मात्र,गेल्या 15 दिवसांपासून डॉक्टर तरुणी ही अतिशय टेन्शनमध्ये होती. ती जेवणही करत नव्हती. कोणत्याही प्रश्नाला वेगळेच उत्तर देत असल्याचंही प्रशांत बनकरच्या बहिणीनं सांगितलं.
तसेच डॉक्टर तरुणी ही नेहमी आमच्या घरी येत असतं. त्यावेळी ती जॉबमध्ये सुरू असलेल्या त्रासाबाबत बोलायची. ती खूप टेन्शनमध्ये असत आणि त्यांना मानसिक त्रास सुरू असल्याचंही स्पष्ट असल्याचा दावाही संशयित आरोपी प्रशांत बनकरच्या बहिणीनं म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.