Amit Shah, Rahul Gandhi, Narendra Modi Sarkarnama
देश

Rahul Gandhi News: मोदी सरकारकडून राहुल गांधींसाठी लावला जातोय 'ट्रॅप', परदेश दौरे अडचणीत? 'या' नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Congress Vs BJP News: खासदार राहुल गांधी हे यांच्या परदेश दौऱ्यात मोदी सरकारच्या कारभारासह अनेक गोष्टींवर आक्रमक आणि परखड मत व्यक्त करत असतात. यावरुन भाजपकडून त्यांच्यावर टीकेची झोडही उठवली जाते.

Deepak Kulkarni

New Delhi News: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काही महिन्यांपासून मोदी सरकारविरोधातील लढाई आणखी तीव्र केली आहे.त्यांनी मतचोरी,केंद्रीय निवडणूक आयोगासह भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.पण आता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या परदेश दौऱ्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आ

इंडियन ओव्हरसिज काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान,त्यांच्यावर मोदी सरकारकडून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप सॅम पित्रोदा यांनी केला आहे.

सॅम पित्रोदा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवरून मोठं भाष्य केलं आहे. ते म्हणाले,राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावेळी भारतीय दूतावासातील अधिकारी सातत्यानं त्यांच्या हालचालींवर 'वॉच'ठेवून असतात.हॉटेलपासून बैठकांपर्यंत इतकंच नव्हे,तर विमानतळांवरही लोक राहुल गांधींसह आमच्यावर लक्ष ठेवून असल्याचा आरोप पित्रोदा यांनी केला आहे.

परदेशातील भारतीय दुतावासामधील अधिकारी हे फोन करून राहुल गांधी यांना भेटू नका, असं विदेशी नेत्यांना सांगत असल्याचं सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी म्हटलं आहे.याबाबत लेखी पुरावे नसून आपण हे अनुभवाच्या आधारावर सांगत आहे,असंही ते म्हणाले.

खासदार राहुल गांधी हे यांच्या परदेश दौऱ्यात मोदी सरकारच्या कारभारासह अनेक गोष्टींवर आक्रमक आणि परखड मत व्यक्त करत असतात. यावरुन भाजपकडून त्यांच्यावर टीकेची झोडही उठवली जाते. पण आजच्या काळात तुम्ही भारतामध्ये जे काही बोलता, ते जगभरात पसरते आणि जे बाहेर बोलता, ते देशात पसरते असल्याचं मत सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केलं आहे.

इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे माजी अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी काही महिन्यांपूर्वीच पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं, असं विधान केलं आहे. यामुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर एकीकडे पाकिस्तानसोबतचे संबंध ताणले गेले असतानाच हे विधान केल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं.

त्यावेळी पित्रोदा यांनी शेजारच्या देशांवर आपल्या परराष्ट्र धोरणाचं लक्ष असायला हवं. या देशांसोबतचे संबंध आपण सुधारू शकतो का? असा सवाल उपस्थित केला होता. तसेच त्यांनी आपण पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळमध्येही राहिलो आहे. पण तुम्हाला सांगतो, तिथे मला आपल्या घरात असल्यासारखं वाटतं. या देशांमध्ये गेल्यावर मला कधीही परदेशात असल्यासारखं वाटत नसल्याचा खळबळजनक दावाही केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT