Waqf Amendment Bill and modi sarkarnama
देश

Waqf Amendment Bill: मोदी सरकारचं तिसऱ्या टर्ममधलं सर्वात मोठंं यश! लोकसभेनंतर राज्यसभेतही 'वक्फ दुरुस्ती विधेयक' मंजूर

Waqf Amendment Bill Passed In Rajya Sabha : वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत बुधवारी (ता.2) मध्यरात्री दीर्घ चर्चेनंतर मतदानाने मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले तसं राज्यसभेतही विधेयक मंजूर करायला एनडीएला फार अवघड जाणार नसल्याचा अंदाज मतदानाआधीच व्यक्त केला जात होता.

Deepak Kulkarni

New Delhi News : लोकसभेत मंजूर झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी(ता.3) दुपारी 1 वाजता राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केलं. यानंतर गेल्या 12 तासांपेक्षा जास्त काळ राज्यसभेत या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा झडली. अखेर मध्यरात्री उशिरा राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी मतदान पार पडलं. यावेळी लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही वक्फ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill) शुक्रवारी (ता.4 एप्रिल) मध्यरात्री मंजूर करण्यात आलं.

राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मध्यरात्री उशिरा 2. 35 वाजण्याच्या सुमारास मंजूर करण्यात आलं. वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या बाजूनं 128 मतदान, तर विरोधात 95 इतकं मतदान करण्यात आलं.अखेर मोदी सरकारनं मोठं यश मिळवत वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर करण्यात आलं. गुरुवारी दुपारी 1 वाजल्यापासून ते रात्री 2 वाजेपर्यंत या विधेयकाच्या मंजुरीसाठी राज्यसभेत आधी चर्चा आणि नंतर मतदान प्रक्रिया पार पडली.

राज्यसभेत(Rajya Sabha) सध्या एकूण खासदारांची संख्या ही 236 खासदार आहे.त्यात बहुमतासाठी 119 खासदारांची आवश्यकता आहे.राज्यसभेत भाजपाकडे 98 खासदार आहेत.तर एनडीएची खासदारांची संख्या ही 115 आहे. जर नामांकित करण्यात आलेल्या सहा सदस्यांना देखील सहभागी केले तर हा आकडा 121 वर पोहोचला. राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्यासाठी 119 सदस्यांची गरज होती. त्यामुळे भाजपकडे दोन सदस्य जास्त असल्यामुळे वक्फ दुरुस्ती विधेयकाचा राज्यसभेत मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला.

राज्यसभेतलं विरोधी पक्ष काँग्रेसकडे 27 खासदार असून इंडिया आघाडीचे घटक पक्ष मिळून एकूण खासदार संख्या 85 इतकी आहे. राज्यसभेतही तीन असे सदस्य आहेत, जे एनडीए आणि इंडिया आघाडी या कोणाचेही सदस्य नाहीत.

वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत बुधवारी (ता.2) मध्यरात्री दीर्घ चर्चेनंतर मतदानाने मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले तसं राज्यसभेतही विधेयक मंजूर करायला एनडीएला फार अवघड जाणार नसल्याचा अंदाज मतदानाआधीच व्यक्त केला जात होता. कारण एनडीएतील जेडीयू, टीडीपी, शिंदेसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी वक्फ विधेयकाला समर्थन आहे.

लोकसभेत एनडीएचे संख्याबळ 293 असून जे 542 सदस्यांच्या सभागृहात बहुमताच्या संख्येपेक्षा साहजिकच पुढे होते.तसेच राज्यसभेतही एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे. कारण राज्यसभेतील एकूण खासदारांची संख्या ही 236 आहेत,ज्यात 2 अपक्ष आणि 6 नामनिर्देशित खासदार आहेत, जे नेहमीच सरकारच्या समर्थनार्थ मतदान करताना दिसून आले आहे.

लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक गुरुवारी (ता.3एप्रिल) रोजी 12 तासांच्या प्रदीर्घ सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान झाल्यानंतर मतदानानंतर मंजूर करण्यात आलं होतं. यावेळी वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने 288 आणि याच्याविरोधात 232 सदस्यांनी मतदान केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT