Mohan Yadav on Madhya Pradesh liquor ban Sarkarnama
देश

Madhya Pradesh liquor ban : मोहन यादव सरकार मोठा निर्णय घेणार; मध्यप्रदेशात धार्मिक स्थळ असलेल्या शहरांमध्ये आता दारूबंदी!

Mohan Yadav Government on liquor ban : संत-महंतांनी याबाबत मागणी केली होती की, ज्यानंतर दारूबंदीबाबत वेगाने हालचाली सुरू आहेत.

Mayur Ratnaparkhe

CM Mohan Yadav on Madhya Pradesh liquor ban : भोपाळ, बिहार आणि उत्तरप्रदेश नंतर आता मध्यप्रदेशातही दारूबंदी लागू होवू शकते. याबाबतची घोषणा स्वत: मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, राज्यात जिथे जिथे धार्मिक स्थळं आहेत, त्या ठिकाणी दारूबंदी करण्याचा निर्णय लागू करण्याबाबत विचार सुरू आहे आणि लवकरच याबाबत ठोस पाऊल उचललं जाईल.

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी म्हटले की, आम्ही लवकरच दारूबंदीची घोषणा करू शकतो. त्यांनी म्हटले की यावर काम सुरू झाले आहे आणि मद्यधोरणात बदल केला जाईल, कारण अर्थसंकल्पीय अधिवेशनही लवकरच आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, संतांनी याबाबत मागणी केली होती की, ज्यानंतर दारूबंदीचं काम वेगाने सुरू आहे.

तसेच आमचे सरकार दारूबंदीबाबत अतिशय गंभीर आहे. जिथे धार्मिक स्थळं आहेत, तिथे हे लागू केले जाईल. त्यांनी म्हटले की धार्मिक क्षेत्र आणि मंदिर क्षेत्राचे शहर सोडून, अन्य शहरांमध्ये दारू विक्री करता येईल. असंही म्हटलं आहे.

मध्य प्रदेशात दारूबंदी हा एक मोठा मुद्दा आहे. माजी मुख्यमंत्री उमा भारती(Uma Bharti) यांनी भाजपच्या मागील सरकारच्या काळात दारूबंदीची मागणी लावून धऱली होती. त्या मीडियाशी बोलताना आपल्या या मागणीबाबत कायमच बोलायच्या. तसेच त्या जिथे जायच्या त्या ठिकाणी दारूमुळे घडलेल्या कौटुंबिक हिंसाचार, भांडण आदींची उदाहरणं देत नशामुक्त होण्याचाही संदेश द्यायच्या.

मुख्यमंत्री मोहन यादव(Mohan Yadav) यांचे म्हणणे आहे की, दारू बंदीमुळे राज्यात धार्मिक वातावरणाला प्रोत्साहन मिळेल आणि लोकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण मिळेल. सरकारच्या या निर्णयामुळे मध्य प्रदेशच्या धार्मिक स्थळांवर श्रद्धा असणाऱ्यांना लोकांना दिलासा मिळेल. हे पाऊल धार्मिक भावनांचा सन्मान करण्याच्यादिशेने एक महत्त्वपूर्ण सुरुवात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT