Mohan Yadav : मध्य प्रदेश मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत मोहन यादव पराभूत!

Mohan Yadav Lost Election : जाणून घ्या, नेमक्या कोणत्या निवडणुकीत आणि का झाला पराभव?
CM Mohan Yadav
CM Mohan YadavSarkarnama

New Delhi News : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी प्रस्थापितांना धक्का देत निवड झालेले मोहन यादव (Mohan Yadav), हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या एका निवडणुकीत पराभूत झाले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतरची त्यांची ही पहिलीच निवडणूक होती. यामुळे या बातमीचीही चांगलीच चर्चा आहे.

भारतीय कुस्ती महासंघाच्या उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांना केवळ पाच मतं मिळाली आहेत. भारती कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष पदावर संजय सिंह यांची निवड झाली आहे. ते माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांचे निकटवर्तीय मानले जातात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

CM Mohan Yadav
Sakshi Malik : कुस्ती महासंघ अध्यक्षांच्या निवडीनंतर साक्षी मलिकने टाकला शेवटचा ‘डाव’

तर उपाध्यक्ष पदासाठी पश्चिम बंगालचे असीत कुमार साहा, पंजाबचे करतार सिंह, मणिपूरचे एन फोने आणि दिल्लीचे जयप्रकाश यांची निवड झाली आहे. भारतीय कुस्ती महासंघासाठी चार उपाध्यक्ष निवडले जाणार होते. मोहन यादव यांनीही या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तोपर्यंत ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनलेले नव्हते.

13 डिसेंबर 2023 रोजी जेव्हा ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले, तोपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारी निघून गेली होती. मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याने त्यांचे या निवडणुकीकडे दुर्लक्ष झाले. परिणामी त्यांना केवळ पाच मतं मिळाली. मात्र मुख्यमंत्री मोहन यादव हे सद्यस्थितीस मध्य प्रदेश कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत.

CM Mohan Yadav
Sameer Wankhede : शाहरुखच्या 'Jawan' मधील फेमस डायलॉगवर समीर वानखेडेंचीही खास 'Reaction', म्हणाले...

कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी गुरूवारी संजय सिंह यांची निवड झाली आहे. त्यांनी कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेत्या अनिता शेरॉन (Anita Sheoran) यांचा पराभव केला. संजय सिंग यांना 47 पैकी 40 मते मिळाली. ब्रिजभूषण यांच्यावर गंभीर आरोप करत दिल्लीत अनेक दिवस आंदोलन केलेल्या कुस्तीपटूंनी शेरॉन यांना पाठिंबा दिला होता.

संजय सिंग हे ब्रिजभूषण यांचे बिझनेस पार्टनर असल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे. त्यामुळे कुस्ती महासंघाची कमान ब्रिजभूषण यांच्याच हातात राहणार असल्याची चर्चा आहे. ते महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष होते. तर भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ब्रिजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय निवडून आल्याने साक्षी मलिकने गुरुवारी कुस्तीला रामराम ठोकला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com