उमा भारतींनी दारूच्या दुकानावर फेकले शेण

Uma Bharti : यापूर्वी उमा भारती यांनी भोपाळ येथील एका गल्लीत दारूच्या दुकानावर दगड फेकला होता.
bjp leader uma bharti
bjp leader uma bharti Sarkarnama
Published on
Updated on

भोपाळ : मध्य प्रदेशात (MP) संपूर्ण दारूबंदीची मागणी करणाऱ्या मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती (Uma Bharti) यांनी मंगळवारी (14 जून) रात्री निवाडी जिल्ह्यातील ओरछा येथील एका दारूच्या दुकानावर (Wine store) शेण फेकले. दारूचे दुकान गावच्या प्रवेशद्वाराजवळ असल्याने त्याच्यावर शेण फेकल्याचे उमा भारती म्हणाल्या. (Uma Bharti Latest News)

bjp leader uma bharti
राष्ट्रपती निवडणूक : भाजपने आधी उमेदवार सांगावा मग आम्ही पाठिंब्याचे ठरवू!

बुंदेलखंडचे अयोध्या म्हणून ओळखल्या जाणारे ओरछा हे राम राजा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. पण या गावच्या प्रवेशद्वाराजवळच दारूचे दुकान आहे. ओरछा येथे दारूचे दुकान असणे चुकीचे असल्याचे भारती म्हणाल्या. त्यामुळे मंगळवारी रात्री त्यांनी या दारूच्या दुकानावर शेण फेकले आणि तसा व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला. मात्र, मंजुरी मिळालेल्या ठिकाणीच दारूचे दुकान असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यापूर्वी भारती यांनी भोपाळ येथे एक गल्लीत दारूच्या दुकानावर दगड फेकला होता.

bjp leader uma bharti
Beed : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मावर बीडमध्ये गुन्हा दाखल

कालपासून सलग ट्विट करणाऱ्या उमा भारती म्हणतात, की ओरछा येथे प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या दारूच्या दुकानाला परवानगी नाही. त्याला अन्य ठिकाणी जागा दिली आहे. परंतु ओरछाच्या प्रवेशालाच दारुचे दुकान थाटले आहे. याप्रकरणी नागरिक आणि संघटनांकडून सातत्याने आंदोलन केले जात आहे. सरकारला निवेदन देखील दिले आहे. प्रशासनाला देखील हे दुकान काढून टाकण्याची विनंती केली आहे. परंतु त्यावर कारवाई होत नसल्याचे त्या म्हणाल्या. अयोध्येसमान पवित्र मानल्या जाणाऱ्या ओरछा नगरीत रामनवमीला दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि आपणही होतो. तेव्हा देखील हे दारूचे दुकान सुरू होते. त्यामुळे गायीचे शेण या दुकानावर टाकल्याचे भारती यांनी सांगितले. दरम्यान, उमा भारती यांनी दारूच्या दुकानावर शेण फेकल्यानंतर दुकान तात्पुरते बंद करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com