Eknath Shinde Yogi Adityanath Arvind kejriwal Sarkarnama
देश

Mood Of Nation : योगी आदित्यनाथ देशातील सर्वात लोकप्रिय CM, एकनाथ शिंदे कोणत्या क्रमांकावर?

India Famous CM : 'मूड ऑफ नेशन'च्या माध्यमातून देशातील 10 लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? याबद्दल जनतेची मते जाणून घेण्यात आली आहेत.

Akshay Sabale

आगामी लोकसभा निवडणुकीच्या ( Loksabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर एक सर्व्हे करण्यात आला आहे. 'इंडिया टुडे'नं 'मूड ऑफ नेशन'च्या माध्यमातून देशातील जनतेची मते जाणून घेतली आहेत. त्यासह देशातील सर्वात 10 लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? याबद्दलही सर्व्हे केला गेला आहे. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्या स्थानी आहेत, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठल्या स्थानी आहेत? त्यांना किती टक्के मते पडली आहेत? हेसुद्धा जाणून घेणार आहोत.

'मूड ऑफ नेशन' सर्व्हेनुसार योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath ) लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या स्थानी आहेत. योगी आदित्यनाथ यांना 46.3 लोकांनी पसंती दर्शवली आहे. यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेत योगी आदित्यनाथ यांना 43 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

योगी आदित्यनाथ यांच्यानंतर दुसऱ्या क्रमाकांवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. केजरीवाल यांना 19.6 लोकांनी पसंती दर्शवली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीॅ ममता बॅनर्जी यांना 8.4 टक्के लोकांची पसंती आहे, तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांना 5.5 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना 2.5 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना 2.3 टक्के, आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्व सरमा यांना 2 टक्के लोकांची पसंती आहे. यानंतर आठव्या क्रमांकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नंबर लागतो. मुख्यमंत्री शिंदे यांना 1.9 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. त्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना 0.5 टक्के, तर सगळ्यात शेवटी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल आहे. त्यांना 0.4 टक्के लोकांनी पसंत केलं आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT