Delhi Political News: आगामी 2024 च्या लोकसभेसाठी सर्वच पक्षांकडून तयारी करण्यात येत आहे. सर्वच पक्षांकडून लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येत आहे. भाजपची एनडीएची जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे तर भाजपविरोधात विरोधी पक्षांची तयार झालेली काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीही निवडणुकीच्या दृष्टीने आघाडी घेत विविध राज्यामध्ये बैठका घेऊन तयारीला लागली आहे. (Latest Marathi News)
२०२४ ला पंतप्रधानपदासाठी भाजपकडून पुन्हा मोदींचाच चेहरा आहे. मात्र मोदींच्या निवृत्तीनंतर भाजपचा प्रमुख चेहरा कोण असणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सी - व्होटर या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणामध्ये याचा अंदाज घेण्यात आला.
'सी व्होटर'ने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधानपदासाठी भाजपचा उमेदवार कोण असणार या प्रश्नावर लोकांना प्रश्न विचारण्यात आले होते. आश्चर्यकारक बाब विद्यमान केंद्रीय गृहमंत्रा अमित शाह यांचा चेहरा पंतप्रधानपदासाठी सर्वात पुढे आले आहे. मोदीनंतर पंतप्रधानपदासाठी भाजपचा सर्वात पसंतीचा चेहरा कोण? असा प्रश्न विचारण्यात आला? या प्रश्नाच्या उत्तराच्या पर्यायामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही होता.
मोदीनंतर भाजपकडून पंतप्रधानपदासाठी सर्वात पसंतीचा चेहरा कोण? या प्रश्नाव सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 29 टक्के लोकांनी अमित शाह यांना पंतप्रधानपदासाठी पसंती दर्शवली. तर योगी आदित्यनाथ यांना दुसऱ्या क्रमांकाची पसंती होती. एकूण 26 टक्के लोकांना योगी पंतप्रधान व्हावेत असे वाटते. तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर नितीन गडकरी आहेत, 15 टक्के लोकांनी गडकरींच्या पंतप्रधान पदासाठी पसंती दर्शवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.