Narendra Modi Asia Cup Final Pakistan  sarkarnama
देश

Asia Cup Final : फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला लोळवले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून दिली 'ऑपरेशन सिंदूर'ची आठवण, म्हणाले, 'निकाल एकच'

Operation Sindoor Narendra Modi Asia Cup Final Pakistan : एशिया कप फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरची आठवण करून दिली.

Roshan More

Narendra Modi News : एशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये फायनल मॅच झाली. या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानने दिलेले 146 धावांचे टार्गेट पाच फलंदाज बाकी असताना पार केले. भारताने मिळवलेल्या या शानदार विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले आणि पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरची आठवण करून देत त्यांच्या जखमेवर मीठ चोळले.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'ऑपरेशनसिंदूर खेळाच्या मैदानावरही आणि निकाल देखील एकच, भारतच जिंकला!आपल्या क्रिकेटपटूंचे अभिनंदन.'

एशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचे तीन सामने झाले. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते. मात्र, बांग्लादेशला पराभूत करून पाकिस्तानने फायनलमध्ये आपली जागा पक्की केली होती. त्यामुळे परंपरागत प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान अशी फायनल होणार होती. त्याची क्रिकेटप्रेमींना उत्सुकता होती.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला विरोध केला होता. भारत पाकिस्तान सामना लाईव्ह PVR मध्ये दाखवला जाणार होता. मात्र, संजय राऊत यांनी ट्विट करत त्याला विरोध केला होता. तसेच PVR मधील शो सुद्ध रद्द करण्यास भाग पाडले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ठाकरेंच्या दणक्यानंतर PVR चे शो रद्द झाल्याबाबत ट्विट देखील केली होती.

मोहसीन नक्वीकडून ट्राॅफी घेतली नाही

भारतीय संघाने विजयानंतर पाकिस्तानचे गृहमंत्री आणि एशिया क्रिकेटचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून भारतीय संघाने विजयाची ट्राॅफी स्वीकारली नाही. भारतीय संघ ट्राॅफी न स्वीकारता मैदानात उपस्थित होता. त्यांनतर ट्राॅफी घेऊन नकवी निघून गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT