Loksabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जनतेने पुन्हा एकदा एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत दिलं आहे. मात्र भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी अर्थातच भाजपला मित्र पक्षाची साथ घ्यावी लागणार आहे. निकालानंतर दिल्लीत एनडीए आघाडीची बैठक पार पडली आणि यामध्ये सर्वानुमते पंतप्रधान मोदींच्या नावाला एनडीए आघाडीतील 21 घटक पक्षाकडून पंतप्रधान पदासाठी समर्थन दिलं आहे.
याशिवाय मोदींनी बुधवारीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. यानंतर 17 व्या लोकसभेच विसर्जनही झाले. दरम्यान मोदी पंतप्रधान पदाची 8 जून रोजी शपथ घेणार असे वृत्त समोर आले होते. मात्र आता शपथविधीचा हा मुहूर्त बदलल्याची माहिती समोर आली असून, एएनआय वृत्तसंस्थेनुसार नरेंद्र मोदी 9 जून रोजी सायंकाळी सहा वाजता शपथ घेण्याची शक्यता आहे.
लोकसभा निकालानंतर दिल्लीत पार पडलेल्या एनडीएच्या बैठकीत म्हटले गेले की, ''एनडीएच्या पक्षांनी लोकसभा निवडणुक 2024 नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एकजुटीने लढली आणि जिंकली. आम्ही सर्वजण नरेंद्र मोदींना(Narendra Modi) सर्वसंमतीने एनडीएचे नेते म्हणून निवडत आहोत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार भारताच्या गरीब-महिला-युवा-शेतकरी आणि शोषित, वंचित आणि पीडित नागरिकांच्या सेवेसाठी प्रतिबद्ध आहे.''
दरम्यान NDA सरकारच्या मंत्रीमंडळाचे सूत्र ठरल्याचे माहिती समोर आली असून, यानुसार भाजप महत्वाची 4 खाती स्वत:कडे ठेवणार आहे. मोदी 3.0 सरकारमध्ये भाजपला मित्र पक्षांना मोठा वाटा द्यावा लागणार आहे. प्रत्येकी 4 खासदारांच्या मागे एक कॅबिनेट मंत्रीपद असा नवा फॉर्म्युला ठरला आहे.
तर, नितीश कुमार(Nitish Kumar) यांच्या संयुक्त जनता दल पक्षाला ३ मंत्रीपद दिली जाणार असून, राष्ट्रीय लोकजन शक्ती पक्ष राम विलास या पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्या पक्षाला 1 कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणार. याशिवाय जितनराम मांझी यांच्या हिंदुस्थान आवामी मोर्चा पक्षाला 1 कॅबिनेट मंत्री पद दिलं जाणार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाला 4 कॅबिनेट मंत्री पद दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय महाराष्ट्रात एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री पद मिळणार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला 1 कॅबिनेट मंत्री पद दिलं जाणार आहे. तसेच अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल पक्षाला 1 कॅबिनेट मंत्री पद, RLD पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांच्या पक्षाला एक कॅबिनेट व जन सेवा पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांच्या पक्षाला 1 मंत्रीपद मिळणार आहे. अशी माहिती समोर आले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.