Nitish Kumar : नितीशकुमारांच्या 'जदयू'ने बिहारसाठी 'NDA'च्या बैठकीपूर्वी केली 'ही' मोठी मागणी!

Janata Dal United News : देशात पुन्हा एकदा NDA आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. परंतु भाजप मात्र स्वबळावर बहुमताचा आकडा गाठू शकलेला नाही.
Nitish Kumar
Nitish KumarSarkarnama

Janata Dal United and NDA Meeting : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. देशात पुन्हा एकदा NDA आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. परंतु भाजप मात्र स्वबळावर बहुमताचा आकडा गाठू शकलेला नाही. त्यामुळे नाही म्हटलं तरी आता भाजपला एनडीए आघाडीमधील मित्र पक्षांवर अवलंबवून रहावं लागणार असल्याचं दिसत आहे.

बुधवारी निकाल जाहीर झाल्यानंतर आता त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. तर एकीकडे एनडीए आघाडी सत्तास्थापनेसाठी दावा करत आहे, तर दुसरीकडे विरोधकांची इंडिया आघाडी देखील त्यांच्याकडे एनडीएमधील काही पक्ष ओढण्यासाठी खटपट करत आहेत, जेणेकरून मोदी(PM Modi) सरकार पुन्हा एकादा स्थापन होणार नाही.

Nitish Kumar
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा

याच दरम्यान आता एनडीए आघाडीमधील एक प्रमुख पक्ष असलेल्या नितीश कुमारांच्या जदयू कडून एक मागणी करण्यात आली आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळायला हवा, अशी मागणी जदयूचे प्रवक्ते के.सी त्यागी यांनी केली आहे.

के सी त्यागी यांनी म्हटले आहे की, आज दिल्लीत एनडीएची बैठक आहे. यामध्ये सर्वच घटक पक्षाच्या नेत्यांना बोलावलं गेलं आहे. नितीश कुमारही(Nitish Kumar) यामध्ये सहभागी होणार आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी जेडीयू कडूनही पाठिंब्याचे पत्र दिले गेले जाईल.

Nitish Kumar
Modi Government : लोकसभा आजच विसर्जित होणार? शपथविधीची तारीख ठरली

याशिवाय केसी त्यागी म्हणाले की, जर मल्लिकार्जुन खर्गे(Mallikarjun Kharge) यांनी मोठं मन दाखवलं असतं, तर आज आम्ही इथे नसतो. त्यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे आम्ही इथे आहोत. जनता दलाने स्पष्ट केलेलं आहे की ही निवडणूक मोदींच्या नेतृत्वात लढवली गेली आहे. कार्यकर्ता सर्वच आपल्या नेत्यांसाठी काही पदाची इच्छा आणि अपेक्षा राखतात जी चुकीची आहे.

कोणत्याही अटीशिवाय आमचा एनडीएला पाठिंबा आहे, परंतु बिहारच्या जनतेच्या हितासाठी विशेष राज्याचा दर्जा मिळावा. याशिवाय बिहारचा विकास शक्य नाही. 293 जागांची संख्या इंडिया आघाडीकडे नाहीतर, एनडीए आघाडीकडे आहे. नरेंद्र मोदीच पंतप्रधान बनतील, असंही केसी त्यागी यांनी स्पष्ट केलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com