Narendra Modi-Donald Trump sarkarnama
देश

Narendra Modi : अमेरिकन मीडियात नरेंद्र मोदींचा डंका; ‘ट्रम्प यांच्याशी वाटाघाटी करण्याचे तंत्र जगभरातील नेत्यांनी मोदींकडून शिकावे’

Narendra Modi-Donald Trump Meeting : ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे ‘एक महान नेते’ असा उल्लेख केला. तसेच, भारत आणि अमेरिका यांच्यात काही महत्त्वाचे व्यापारी करार होणार आहेत, असेही म्हटले आहे.

Vijaykumar Dudhale

Modi America Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचे तेथील मीडियामध्ये खूप कौतुक होत आहे. दोन दिवसीय अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी संरक्षण, व्यापार आणि संरक्षण सहकार्यावर चर्चा केली. विशेषतः ट्रम्प यांच्यासोबत मोदी यांनी केलेल्या डिप्लोमसीचे कौतुक होत आहे. मोदी आणि ट्रम्प भेट ही जगभरातील नेत्यांसाठी एक ‘मास्टर क्लास’ आहे, असेही एका अमेरिकन पत्रकाराने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) जेव्हा अमेरिकेत होते. त्याचवेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व देशांवर रिसिप्रोकल टैरिफ (परस्पर समान व्यापार शुल्क) लादण्याबद्दल भाष्य केले होते. याचा अर्थ असा की, एखादा देश अमेरिकेवर जे शुल्क लादतो, त्या बदल्यात अमेरिकाही तोच दर लावेल.

ट्रम्प यांनी भारताला ‘टॅरिफ किंग’ असे म्हटले आहे. पण त्यानंतरही मोदींनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याशी उत्तम पद्धतीने वाटाघाटी केल्या. त्याचा परिणाम असा झाला की, ट्रम्प यांनी स्वत: पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे ‘एक महान नेते’ असा उल्लेख केला. तसेच, भारत आणि अमेरिका यांच्यात काही महत्त्वाचे व्यापारी करार होणार आहेत, असेही म्हटले आहे.

सीएनएनचे वरिष्ठ पत्रकार विल रिप्ले यांनी आपल्या एक्स अकाउंटवर म्हटले आहे की , जपानचे पंतप्रधान इशिबा यांच्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी अत्यंत सकारात्मक भेट झाली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी कशा प्रकारे वाटाघाटी करायच्या, हे जगभरातील नेत्यांसाठी मोदी आणि ट्रम्प भेट हा उत्कृष्ट नुमना आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची ही आठवी बैठक होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टन होते, तेव्हाच ट्रम्प यांनी रिसिप्रोकल टैरिफबाबत घोषणा केली होती. व्यापारासंदर्भात ताणावाचे वातावरण असूनही संभाव्य व्यापार करार, ऊर्जा आणि लष्करी क्षेत्रांच्या करारात ह्या दोन्ही देशांनी पुढचे पाऊल टाकले आहे.

बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी करार झाल्याचे जाहीर केले आहे. दोन्ही देश व्यापार करारावरीला चर्चेला गतील देतील. भारतात अणुऊर्जेच्या क्षेत्रात अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. अमेरिकेने भारताला F-35 लढाऊ विमान देण्याची ऑफर दिली आहे. त्याचा दोन्ही पक्षांना फायदा होणार आहे.

पीएम मोदींच्या घोषणेचे कौतुक

विल रिप्ले यांनी पंतप्रधान मोदींच्या 'MIGA + MAGA = MEGA' घोषणेचे कौतुक केले. ते म्हणाले की मोदीनी केलेले अतिशय स्मार्ट ब्रँडिंग आहे. ट्रम्प यांना अशा प्रकारची घोषणा ऐकायला आवडते. खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी आपली स्पर्धा नसून ते माझ्यापेक्षा खूप चांगले वाटाघाटीकार आहेत, असेही म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT