Jharkhand Vidhan Sabha Election Sarakarnama
देश

Jharkhand Assembly Election and BJP : झारखंड निवडणुकीसाठी 'NDA' आघाडीचं ठरलं; भाजप 'या' पक्षांसोबत एकत्र निवडणूक लढवणार!

Mayur Ratnaparkhe

NDA Alliance and Jharkhand Assembly Election : आगामी काळात झारखंडमध्येही विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या टीमनेही नुकतीच रांची येथे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि परस्थितीचा आढावा घेतला आहे. तर सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसलेली आहे. केंद्रातील सत्ताधारी एनडीए आघाडी देखील या निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी उतरत आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपने(BJP) झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी आपले सहकरी पक्ष कोण असतील, याबाबत घोषणा केली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटले की, झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजप आपले सहकारी पक्ष आजसू आणि जदयू यांच्यासोबत निवडणूक लढणार आहे.

आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे झारखंड सहप्रभारी हिमंत बिस्वा सरमा यांनी शनिवारी एनडीए आघाडीत सहभागी होणाऱ्या पक्षांच्या नावांची घोषणा केली. त्यांनी म्हटले की, भाजप झारखंडमध्ये आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या(NDA) घटक पक्षांसोबत आणि ऑल झारखंड स्टुडंट्स यूनिय(आजसू) व जनता दल(यूनाइटेड)यांच्योबत मिळून लढणार आहे. सहकारी पक्षांसोबतच जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे.

त्यांनी रांचीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, भाजप, आजयू आणि जेडीयू यांच्यासोबत मिळून निवडणूक लढणार आहे. सहकाऱ्यांसोबत 99 टक्के जागांवर सहमती झालेली आहे. उर्वरीत एक किंवा दोन जागांसाठी चर्चा सुरू आहे आणि त्यावरही लवकरच निर्णय होईल.

याबाबतची औपचारिक घोषणा पितृ पक्षानंतर केली जाईल, जे दोन ऑक्टोबर रोजी संपणार आहे. झारखंड(Jharkhand )मध्ये 81 सदस्यीय विधानसभेसाठी निवडणूक या वर्षाच्या अखेरीस प्रस्तावित आहे, कोणत्याही क्षणी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली जाऊ शकते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT