Jharkhand Politics : हेमंत सोरेन सरकार पुन्हा संकटात? ; ''झामुमो अन् काँग्रेसचे 15-16 आमदार भाजपच्या संपर्कात ''

Jharkhand BJP Vs JMM : भाजपचे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या दाव्याने झारखंडमधील राजकारणात खळबळ; जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत?
JMM and BJP
JMM and BJPSarkarnama
Published on
Updated on

Jharkhand BJP and Hemant Soren Govt : लोकसभा निवडणुक संपल्यानंतर आता अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. झारखंडमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. तत्पुर्वी पक्ष बदलाच्या राजकारणाने जोर धरल्याचे दिसून ये आहे. तर आसामचे मुख्यमंत्री आणि झारखंड भाजपचे निवडणूक सहप्रभारी हिमंता बिस्वा सरमा यांनी मोठा दावा केला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, झारखंडमध्ये जेएमएम आणि काँग्रेसचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. जवळपास १५ ते १६ आमदार असे आहेत, जे भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत.

हिमंता सरमा(Himanta Sarma) यांनी केलेल्या दाव्यामुळे झारखंडच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. कारण, काही दिवसांपूर्वीच सत्ताधारी पक्ष असणाऱ्या झामुमोला भाजपने मोठा दणका देत, ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांना भाजपात सामील करून घेतले आहे. तर विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील नुकतेच पुन्हा एकदा सत्तेत बसले आहेत. अशात जर आता पुन्हा एकदा भाजपने मोठी खेळी केली आणि जर झामुमो आणि काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये गेले, तर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे सरकार संकटात सापडण्याची दाट शक्यता आहे.

JMM and BJP
Rahul Gandhi News : '..तर मला नाही वाटत, भाजप 246च्या जवळपासही पोहचली असती'

भाजप(BJP) नेते आणि झारखंडचे सहप्रभारी हिमंता सरमा यांनी रांची विमानतळावर मीडियाशी बोलताना सांगितले की, काँग्रेस आणि जेएमएमचे १५-१६ आमदार तिकीटाच्या आशेने नेहमीच माझ्या संपर्कात आहेत. परंतु मी त्यांना म्हणालो आहे, की सद्यस्थितीस त्यांच्यासाठी भाजपमध्ये कोणतीही जागा नाही. कारण, आमचे कार्यकर्तेच विजयी होणार आहेत.

याशिवाय हिमंता सरमा यांनी स्पष्ट केलं की, त्यांची पहिली प्राथमिकता झारखंड भाजपच्या नेत्यांना असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या आमदारांशी संपर्क होवूनही त्यांना अद्याप भाजपमध्ये प्रवेश दिलेला नाही.

JMM and BJP
Mahavikas Aghadi on Bawankule: संकेत बावनकुळेच्या कार अपघात प्रकरणावर 'मविआ'तील तिन्ही पक्षांची वेगळी भूमिका!

काही दिवसांपूर्वीच जेएमएम पक्षाला मोठा झटका देत, माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन(Champai Soren) यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. जवळपास 35 वर्षे जेएमएम पक्षात महत्त्वाची भूमिका निभावणारे आणि हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यानंतर, मुख्यमंत्री पदावर विराजमान होत झारखंडचा कारभार चालवलेल्या चंपई सोरेन यांनी 30 ऑगस्ट रोजी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. चिंपई सोरेन यांना भाजपमध्ये आणण्यातही हिमंता सरमा यांची मुख्य भूमिका होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com