Lok Sabha, Narendra Modi Sarkarnama
देश

NDA in Lok Sabha : मोठी घडामोड : ‘एनडीए’चंही संख्याबळ होणार कमी, खासदाराचे पद जाणार? लोकसभा अध्यक्षांच्या हाती निर्णय...

Girdhari Yadav disqualification notice : 'एनडीए'मध्ये संयुक्त जनता दल हा महत्वाचा पक्ष मानला जातो. पक्षाचे अध्यक्ष व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आता राज्यसभेचे सदस्य असणार आहेत.

Rajanand More

Political news India : काँग्रेसच्या आसाममधील खासादाराने पदाचा राजीनामा दिल्याने पक्षाचे संख्याबळ ९८ वर आले आहे. त्यानंतर आता लोकसभेतील एनडीएचेही संख्याबळ कमी होण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’तील प्रमुख पक्षाच्या खासदाराला अपात्र ठरविण्याचे पत्र याच पक्षाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले आहे.

एनडीएमध्ये संयुक्त जनता दल हा महत्वाचा पक्ष मानला जातो. पक्षाचे अध्यक्ष व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आता राज्यसभेचे सदस्य असणार आहेत. पण त्यांनी सदस्यत्वाची शपथ घेण्याआधीच त्यांचे लोकसभेतील संख्याबळ कमी होण्याची शक्यता आहे. पक्षाचे लोकसभेतील गटनेते दिलेश्वर कामात यांनी खासदार गिरधारी यादव यांना अपात्र ठरविण्याची मागणी बिर्ला यांच्याकडे केली आहे.

गिरधारी यादव हे सातत्याने पक्षविरोधी भूमिका घेत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मागील अनेक महिन्यांपासून ते पक्षाच्या भूमिकेच्या विपरीत भूमिका मांडत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. एसआयआर, ईव्हीएम आदी मुद्यांवर त्यांनी सातत्याने पक्षाच्या प्रतिमेला तडा जाईल, अशी विधाने केली असल्याचा दावा पक्षातील नेते करत आहेत.

बिहार सरकारच्या धोरणांवरही यादव यांनी अनेकदा बोट ठेवले होते. त्यामुळे पक्षातील नेत्यांची त्यांच्यावर नाराजी होती. यादव हे पक्षापासून दूर जात असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर नितीश कुमार पक्षाचे पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर यादव यांच्या सदस्यतेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता ओम बिर्ला हे जेडीयूच्या पत्रावर काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

गिरधारी यादव यांनी यावर बोलताना सांगितले की, नितीश कुमार यांच्यासोबत असल्यापासून कधीच पक्षविरोधी काम केले नाही. लोकसभा अध्यक्षांचे समन्स आल्यानंतर त्यावर मी उत्तर देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यादव यांचे पुत्र चाणक्य यादव यांनी बिहार निवडणुकीआधी राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला होता. मात्र, निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्याचवेळी यादव यांच्या पक्षनिष्ठेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तेव्हापासून ते पक्षनेतृत्वाच्या निशाण्यावर होते, अशी राजकीय वर्तूळात चर्चा आहे.      

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT