Ashok Kharat case update : धक्कादायक : अशोक खरातच्या मंदिरासाठी सरकारचा कोटींचा निधी, GR च आला समोर...

Temple fund gr maharashtra : बांधकामाचा प्रस्ताव शासनापर्यंत पोहोचला कसा तो मंजूर कोणी केला आणि का केला? मंत्री-सचिव कोण होतं? याची कायदेशीर वैधता कुणी तपासली?, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Ashok Kharat case update
Ashok Kharat case updateSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Government news : भोंदूबाबा अशोक खरातचे राजकीय नेत्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे समोर आले आहे. अनेक बड्या नेत्यांनी खरातच्या मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. त्याच्यासाठी सरकारी निधीचा मोठा वापर झाल्याचेही आता समोर आले आहे. महाराष्ट्र सरकारने याच मंदिरासाठी तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचा शासन निर्णयच आता समोर आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सोशल मीडियात हा जीआर पोस्ट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भोंदू अशोक खरातच्या बेकायदा ईशानेश्वर मंदिरासाठी थेट शासनाचीच मदत? उपलब्ध सरकारी शासन निर्णयनुसार ,नाशिक जिल्ह्यातील श्री ईशान्येश्वर देवस्थान (मिरगाव, सिन्नर) येथे विकास कामांसाठी तब्बल 1 कोटी 5 लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यातील 25 लाखांचा निधी 2018 सालासाठी मंजूर करण्यात आला आहे. 

या निधीत सभामंडप बांधकाम, भक्त निवास, चेंजिंग रूम, पार्किंग सुशोभीकरण वा इतर सुविधांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या मंदिराला शासकीय भाषेमध्ये सिद्धक्षेत्र असं म्हणण्यात आलं आहे. शासनातल्या कोणी आणि कसं हे मंदिर सिद्धक्षेत्र आहे असं ठरवलं, असा सवाल कुंभार यांनी उपस्थित केला आहे.  

Ashok Kharat case update
Ashok Kharat case update : अशोक खरातप्रकरणात झाली मातब्बर वकिलाची एन्ट्री; अनेक खटल्यात दाखवलाय कायद्याचा हिसका...

बांधकामाचा प्रस्ताव शासनापर्यंत पोहोचला कसा तो मंजूर कोणी केला आणि का केला? मंत्री-सचिव कोण होतं? याची कायदेशीर वैधता कुणी तपासली? या बांधकामाला जनतेच्या पैशातून निधी का? याचा अर्थ शासन भोंदू बाबांना संरक्षण देत आहे का?, असे अनेक प्रश्न कुंभार यांनी उपस्थित केले आहेत. म्हणूनच मी म्हणत होतो, हा भोंदू बाबा सरकार पुरस्कृत भोंदू बाबा होता असं म्हणायला जागा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Ashok Kharat case update
Ashok Kharat Case: भोंदूबाबा खरातचं नाव 'अशोक' नव्हेच समोर आली धक्कादायक माहिती; स्वत:च्या नावातही झोल...

दरम्यान, ३१ मार्च २०१८ रोजीचा हा शासन निर्णय पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने काढला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात हे खाते जयकुमार रावल यांच्याकडे होते. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सन २०१७-१८ मध्ये निधीची तरतूद करण्यात आली होती.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com