NEET UG 2026 
देश

NEET-UG 2026 मध्ये 'कोडनेम गेम'! तपासात समोर आला पेपर लीकचा धक्कादायक कट

NEET-UG 2026 : मेडिकल कॉलेजच्या प्रवेशासाठी घेतल्या गेलेल्या नीट परीक्षेचा फायदा मिळवून देण्यासाठी सुनियोजित कट रचला गेल्याचं आता तपासातून समोर आलं आहे.

Amit Ujagare

NEET-UG 2026 : मेडिकल कॉलेजच्या प्रवेशासाठी घेतल्या गेलेल्या नीट परीक्षेचा विशिष्ट विद्यार्थ्यांनाच फायदा मिळवून देण्यासाठी सुनियोजित कट रचला गेल्याचं आता तपासातून समोर आलं आहे. यासाठी दोन कोडनेम वापरण्यात आले होते. त्यानुसार, परीक्षा केंद्रांवरच पेपर प्रिंट केले गेले आणि विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्याचा खळबजनक खुलासा सीबीआयनं केला आहे.

देशभरातील मेडिकल कॉलेजेसमध्ये आपल्याला प्रवेश मिळावा यासाठी सुमारे २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे (NTA) आयोजित ३ मे रोजी NEET-UG 2026 परीक्षा दिली होती. पण याचा पेपर लीक झाल्याचं समोर आल्यानंतर एनटीएकडून ही परीक्षाच रद्द करण्यात आली होती. या परीक्षेवरच आपलं पुढचं भवितव्य अवलंबून असणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना यामुळं धक्का बसला. यापैकी जबरदस्त धसका घेतलेल्या काही विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था बिघडली आणि यांपैकी २० विद्यार्थ्यांनी स्वतःचं जीवन संपवलं. यानंतर तरुणांनी या यंत्रणेविरोधात आणि त्याला जबाबदार असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना लोकशाही मार्गानं आंदोलन करत राजीनामा द्यायला भाग पाडलं. इंडियन एक्सप्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.

पेपर लीकच्या तपासात ७७ दिवसांचा मोठा टप्पा पूर्ण केल्यानंतर सीबीआयनं मंगळवारी दिल्लीच्या फास्टट्रॅक कोर्टात आपली चार्जशीट सादर केली. या चार्जशीटमध्ये नीटचा पेपरफुटीला कारणीभूत ठरलेल्या १३ आरोपींच्या नावाचा समावेश केला आहे. यामध्ये NTA मध्ये पेपर सेट करण्याचं काम करणाऱ्या जीवशास्त्राच्या तज्ज्ञ पुण्यातील एका कॉलेजच्या प्रा. मनीषा मांढरे, रसायनशस्राचे तज्ज्ञ पुण्यातीलच प्राध्यापक प्रल्हाद विठ्ठलराव कुलकर्णी आणि भौतिकशास्त्राचे तज्ज्ञ प्रा. मनिषा संजय हवालदार यांच्या नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे तिघेही पुण्यातीलच आहेत.

पेपर सेट करण्याची प्रक्रिया

तपासादरम्यान जेव्हा सीबीआयनं एनटीएला विचारलं की, नीटची परीक्षा तयार करण्याची प्रक्रिया काय आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, एनटीएनं सीबीआयला सांगितलं की, नीट परीक्षेसाठी एकूण चार मास्टर सेट तयार केले जातात. प्रत्येक सेटमध्ये १८० प्रश्न असतात, ज्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पती शास्त्र आणि प्राणीशास्त्र या विषयांमध्ये एकसारखं वाटलं जातं. म्हणजेच प्रत्येक सेटमध्ये प्रत्येक विषयाचे प्रत्येकी ४५ प्रश्न विचारले जातात.

एनटीएच्या अधिकाऱ्यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितलं की, या चार मास्टर प्रश्नपत्रिकांच्या सेटमध्ये दोन सेट्स अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सेटच्या रुपात निवडलं जातं. यांच्याच प्रिंट काढून त्या परीक्षा केंद्रांवर पाठवल्या जातात. यामध्ये जे दोन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सेट्स तयार केले गेले त्यांचे कोडनेम 'कैलाश' आणि 'शिवालिक' असे ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे प्रश्नपत्रिकांचे इतर दोन सेट्स हे नॉन अॅडमिनिस्ट्रेटिट सेट्स असतात जे सामान्य परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये वाटप केले जात नाहीत. पण या दोन सेट्समधील प्रश्नपत्रिकांमधील चार वेग-वेगळ्या सीरीज तयार करण्यात आल्या होत्या. या चारही सिरीजमध्ये एकच प्रश्न रँडम पद्धतीनं टाकण्यात आले होते, कारण परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना विविध क्रमाच्या प्रश्नांच्या प्रश्नपत्रिका मिळाव्यात.

पण तपासादरम्यान सीबीआयला त्या दोन मेसेजिंग अॅप ट्रेल्सचा सुगावा लागला. ज्यांच्या माध्यमातून लीक झालेल्या प्रश्नपत्रिका पुढे पाठवण्यात आल्या. या दोन्ही ट्रेल्सची सुरुवात महाराष्ट्रापासून झाली. यांपैकी एक राजस्थान-हरयाणा मार्गे पुढे गेली तर दुसरी राजस्थान-केरळमार्गे पाठवण्यात आली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा प्रकार देशव्यापी कट-कारस्थानाचा भाग होता. या कटामध्ये विषयतज्ज्ञ, कोचिंग क्लासेस आणि एजंटांचा समावेश होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT