

Uddhav Thackeray: जेनझी तरुणांचा झुरळ असा तुच्छतापूर्ण उल्लेख करण्यावरुन शिवसेना (युबीटी) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच भडकले असून त्यांनी या तरुणांच्या जिद्दीला सलाम केला आहे. याचा दाखला देण्यासाठी त्यांनी थेट मुघलांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला दिला. यावरुन त्यांनी सन्मान आणि संघर्ष कसा असतो हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबईत शिवसेनेचे (युबीटी) प्रवक्ते हर्षल प्रधान यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी दोन्ही नेत्यांनी तरुणाई, लोकशाही, हिंदुत्व, बेरोजगारी आणि केंद्र सरकारशी संबंधित अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.
यावेळी आंदोलक जेनझी विद्यार्थ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या अपमानकारक भाषेवर सडकून टीका केली. त्यांनी म्हटलं की, ज्या तरुणांना झुरळ म्हटलं गेलं, ते केवळ १६०१७ वर्षांचे विद्यार्थी आहेत. यावेळी इतिहासाचा दाखला देताना त्यांनी म्हटलं की, मुघलांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना 'पहाड का चुहा' असं संबोधलं होतं. पण यामुळं त्यांचा सन्मान आणि संघर्ष यावर कोणताही परिणाम झाला नाही. आजच्या तरुणांसाठी अशा प्रकारच्या भाषेचा वापर हा लोकशाही मुल्यांच्या विपरित आहे.
त्यांनी पुढे म्हटलं की, आज जर कोणतीही व्यक्ती आपले अधिकार आणि न्यायाची मागणी करत असेल तर त्याला लगेचच दहशतवादी किंवा देशविरोधी म्हटलं जातं. यावेळी ठाकरेंनी त्या तरुणीचाही उल्लेख केला जिनं पोलिसांची गाडीच रोखून धरली होती. ठाकरे म्हणाले की, त्या मुलीला कट्टरतावादी सातत्यानं सोशल मीडियावरुन ट्रोल करत आहेत.
या कार्यक्रमात राज ठाकरेंनी देखील अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटलं की, आज तरुण पिढीनं हे दाखवून दिलंय की, लोकशाही कमजोर होत आहे. त्यांच्यानुसार, जर कोणी आपल्या अधिकारांसाठी आवाज उठवत असेल तर त्याला चुकीच्या पद्धतीनं बदनाम केलं जात आहे. यावेळी राज यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या २०० वर्षांपर्यंत व्यवस्थित राहतील असे खड्डेमुक्त रस्ते बनवण्याच्या विधानावर टीका करताना म्हटलं की, देशात काही पूल १५ दिवसांतच पडतात. त्याचबरोबर ठाकरेंनी केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सितारामण यांच्या पेपरलीक संबंधी विधानांवर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.