Delhi CM House Sarkarnama
देश

Delhi CM House : दिल्ली मुख्यमंत्री निवासस्थानावरून उफाळणार नवा वाद? ; आतिशींना नाही मिळाली घराची चावी, कारण...

Arvind Kejriwal Left CM House : अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शासकीय निवासस्थान सोडले होते. मात्र, आता...

Mayur Ratnaparkhe

Delhi Political News : दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी यांची निवड झाल्यानंतर आणि त्यांनी पदभार घेतल्यानंतर, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी ते राहत असलेले शासकीय निवासस्थान सोडलं आहे. मात्र तरीही विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांना अद्याप या घरात प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा दिल्ली मुख्यमंत्री निवासस्थानावरून नवा वाद उफाळण्याची चिन्हं दिसत आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर घर सोडले होते. मात्र, आता दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री आतिशी(Atishi) जेव्हा सामान घेऊन दिल्ली मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचल्या असता त्यांना घराची चावी देण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.

PWD विभागाने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कुलूप लावले असल्याची माहिती समोर आली आहे. केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी राजीनामा दिल्यानंतर कायदेशीररित्या घराचं हॅन्ड ओव्हर झाला नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

या संदर्भात दिल्लीच्या विजेलंस विभागाने PWDच्या दोन विशेष अधिकाऱ्यांना आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष सचिवांना नोटीस बजावली आहे. केजरीवाल यांनी पदावर असताना घरात काही काम केलं होतं हे काम अनियमित होतं असा आरोप करण्यात आला होता. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळं चावी देण्यात आली नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला (AAP) संपूर्ण बहुमत मिळाले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर केजरीवाल 2015 पासून शासकीय निवासस्थानी राहत होते. एका सभेत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचा मुख्यमंत्री असून देखील घर खरेदी करू शकलो नाही, असे म्हटलं होतं. दिल्लीचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी केजरीवाल गाझियाबादच्या कौशांबी भागात राहात होते. मुख्यमंत्री असताना ते मध्य दिल्लीतील टिळक लेनमध्ये असलेल्या घरात राहायचे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT