Uttarakhand News : पहलगाम हल्ल्यानंतर देशात संताप उसळला होता. दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची हत्या केल्याने त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी होत होती. यानंतर भारताने ऑपरेश सिंदूरमधून पाकिस्तानमध्ये घुसून मोठी कारवाई केली. ज्यात दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष करण्यात आले. यात जवळपास 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या ‘ऑपरेशन सिंदूर’ची नंतर जगभरात चर्चा झाली. आता हेच ‘ऑपरेशन सिंदूर’ पाठपुस्तकातून विद्यार्थ्यांच्या समोर जाणार आहे. विशेष म्हणजे मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात याचा समावेश करण्याचा निर्णय भाजपशासित राज्याने निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानमधील दहशवादी कारवाईनंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घसून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. यामुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे. अद्याप या धक्क्यातून पाकिस्तान सावरले नसून त्यांना पाठिंबा देणार्या तुर्कीला देखील भारताने धक्का दिला आहे. यानंतर आता ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी मोहिमेला उत्तराखंडमधील शालेय पुस्तकांमध्ये स्थान दिलं जाणार आहे. तसेच या ‘ऑपरेशन सिंदूर’ची कहाणी येथील मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा उत्तराखंड मदरसा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मुफ्ती शामुन कासमी यांनी केलीय. ही घोषणा त्यांनी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर केली आहे.
यावेळी कासमी माध्यमांशी संवाद साधत म्हणाले, पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून कारवाई केली. ही बाब आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. याची माहिती भावी पिढीला, शालेय मुलांपर्यंत जायला हवी. यामुळेच आम्ही यंदा सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासूनच याची अमलबाजावणी करत आहोत. प्राथमिक ते वरिष्ठ माध्यमिक वर्गांपर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमात ऑपरेशन सिंदूरचा समावेश करण्यात येणार आहे. याचा उद्देश मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सुरक्षा आणि भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याबद्दल माहिती जाणून घेण्यास मदत करणे हा आहे.
विशेष म्हणजे हा निर्णय मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत घेण्यात आला आहे. फक्त मुलांना धार्मिक शिक्षण न देता आधुनिक शिक्षणाशी जोडणे ही आजच्या काळाची गरज आहे. ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक लष्करी कारवाई नसून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल होते. त्यामुळे मदरशांमध्ये सकाळच्या नमाजाच्या वेळीही या मोहिमेबाबत माहिती दिली जाईल", असं कासमी यांनी सांगितलं आहे.
कासमी यांनी पाकिस्तानवर टीका करताना, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये आमच्या निष्पाप नागरिकांवर हल्ला केला. अशा देशाचे नाव पाकिस्तान नव्हे तर ‘नापाकिस्तान’ असायला हवे. त्यांनी इस्लामच्या शिकवणुकीचाही अपमान केला असून इस्लामकधीच निरपराध व्यक्तीचा खून करण्याची शिकवन देत नाही. एका निरपराध व्यक्तीचा खून म्हणजे संपूर्ण मानवजातीचा खून असे इस्लाम मानतो. मात्र पाकिस्तान या गोष्टीला मानत नाही. त्यामुळेच आमच्या विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हीच आमची प्राथमिकता आहे, असे कासमी यांनी म्हटलं आहे.
उत्तराखंडमध्ये 451 मदरसे असून सुमारे 50,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. अभ्यासक्रम समितीच्या बैठकीनंतर, ऑपरेशन सिंदूरवरील प्रकरण लवकरच अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाईल असेही कासमी यांनी सांगितलं आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 26 पर्यटकांची हत्या दहशतवाद्यांनी केली. यानंतर भारताने 7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत 25 मिनिटांत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. ज्यात बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय, मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाचा तळ आणि सियालकोटमधील सरजल कॅम्प हे महत्त्वाचे लक्ष्य होते. ज्यात 100 हून अधिक दहशवाद्यांचा खात्मा झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.