Pahalgam Terror Attack, NIA  Sarkarnama
देश

Pahalgam Terror Attack Update : पहलगाम हल्ल्याप्रकरणी मोठी कारवाई, दोघांना अटक; दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचे उघड

Pahalgam Terror Attack Parvez Bashir Jothar Arrested : पहलगाममध्ये पर्यटनासाठी गेलेल्या तब्बल 27 पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या होत्या. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांची ओळख आता समोर आली आहे.

Roshan More

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्याला दोन महिने होऊन गेले आहेत. या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मोठी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. दहशतवादी हल्ला प्रकरणी तब्बल 27 नागरिकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना या दोघांनी आश्रय दिल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे आश्रय दिलेले दोघेही बंदी घातलेल्या लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेशी संबंधी आहेत.

अटक केलेल्यांची नावे परवेझ जोथर, बशीर जोथर अशी आहेत. परवेझ जोथर हा बटकोट येथील रहिवासी असून बशीर हा पहलगाममधील हिलपार्क येथील रहिवाशी आहेत. पहलगाममध्ये पर्यटकांना हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना या दोघांनीही आश्रय दिला होता.

पहलगाममध्ये पर्यटनासाठी गेलेल्या तब्बल 27 पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या होत्या. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांची ओळख त्यानंतर समोर आली. हाशिम मुसा उर्फ सुलेमान,आदिल हुसैन,अलिभाई उर्फ तल्हाभाई अशी त्यांची नावे होती. या तीनही दहशतवाद्यांना परवेझ जोथर, बशीर जोथर यांनी आश्रय देत हल्ल्यासाठी मदत केल्याची माहिती आहे.

ऑपरेशन सिंदूर

पहलगाम हल्ल्यानंतर भारती लष्कराने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले. या मिशनला ऑपरेशन सिंदूर नाव देण्यात आले होते. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत पाकिस्तानध्ये युद्ध देखील झाले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने दोनही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. मात्र, ऑपरेशन सिंदूर अजून थांबलेले नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT