Pune News : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्व करत असलेल्या शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये संघर्ष वाढताना पाहायला मिळत आहे. एकीकडे दोन्ही पक्षातील शीर्ष नेतृत्व एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान देत असतानाच दुसरीकडे स्थानिक पातळीवर देखील दोन्ही पक्षांमधील संघर्ष शिगेला पोहोचला असल्याचे पाहायला मिळत आहे.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी “Come on, kill me” असा आव्हाने दिले. या टप्प्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर थेट ‘मेरे हुए को क्या मारना?’ असा प्रत्युत्तर दिल.तसेच, शिंदे यांनी विधानसभा निवडणुकांत उद्धव ठाकरे यांच्या अपयशासंदर्भातील आकडेवारी सादर करत, “मतदारांनी तुमचा मुद्दा पाडला” असा टोला लगावला.
शिवसेना वर्धापन निमित्ताने शिंदे आणि ठाकरे यांच्यातील शब्दयुद्ध हे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे रणशिंगच मानलं जात आहे. या दोघांमध्ये झालेल्या शब्द युद्धाच्या प्रतिक्रिया आता स्थानिक पातळीवर ती देखील उमटताना पाहायला मिळत आहे.
पुण्यामध्ये शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी शहरातील प्रमुख भागांमध्ये भले मोठे बॅनर लावले आहेत. या बॅनरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचा वापर करण्यात आला आहे. या व्यंगचित्रांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या एका हातात कुबडी तर दुसऱ्या हातामध्ये ऑक्सिजनचा ,टॅंक पाहायला मिळत आहे तसेच या ऑक्सिजनच्या टॅंक वर काँग्रेस पक्षाच्या चिन्ह असलेलं हातात निशाण पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरेंना डिवचणाऱ्या व्यंगचित्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील चित्र काढण्यात आले आहे. या व्यंगचित्रात एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये भगवा झेंडा आणि धनुष्यबाणाचे चिन्ह देण्यात आले आहे.एक प्रकारे या व्यंगचित्रातून शिंदे यांनी पक्ष, चिन्ह आणि हिंदुत्व राखलं असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करू उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला डीवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच व्यंगचित्रात ते बोलण्यात व्यस्त आहेत आणि आम्ही काम करण्यात मग्न आहोत, असे कॅप्शन देखील देण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.