PM Modi Security : 'पहलगाम'नंतर मोदींच्या सभेसाठी ड्यूटी पण अतिरिक्त जिल्हाधिकारी गायब, सरकारकडून थेट उचलबांगडी

ADM Skips Duty During Modi's Rally in Bihar : बिहारमध्ये हा प्रकार घडला आहे. पंतप्रधान मोदी 24 एप्रिल रोजी बिहारच्या दौऱ्यावर होते. मधुबनी येथे त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Protocol Violation Raises Administrative Concerns : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली होती. पण प्रशासनातील कुणालाही कल्पना देता संबंधित अधिकारी ड्यूटीवर हजर झाला नाही. याची सरकारने गंभीर दखल घेत संबधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. या अधिकाऱ्याच्या नोकरीवरही आता टांगती तलवार आहे.

बिहारमध्ये हा प्रकार घडला आहे. पंतप्रधान मोदी 24 एप्रिल रोजी बिहारच्या दौऱ्यावर होते. मधुबनी येथे त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही मोदींची पहिलीच सभा असल्याने कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. समस्तीपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिराम कुमार यांनाही या सभेसाठी ड्युटी लावण्यात आली होती.   

अभिराम कुमार यांनी कुणालाही माहिती न देता सभेच्या ठिकाणी हजेरी लावली नाही. त्यामुळे प्रशासनातही याबाबत खळबळ उडाली. पंतप्रधान मोदींची सभा असताना अभिराम कुमार यांच्या अनुपस्थितीची सरकारकडूनही गंभीर घेण्यात आली. सरकारने तातडीन याबाबत चौकशीचे आदेश दिले.

Narendra Modi
DK Shivakumar Video : मी तर ‘रॉयल चॅलेंज’ पितही नाही..! RCB च्या प्रश्नावर शिवकुमार नको ते बोलले अन्...

मधुबनीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणाची चौकशी करून सरकारला अहवाल पाठवला होता. त्याआधारे सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना काढत अभिराम कुमार यांना निलंबित केले. अभिराम यांनी सुरक्षा व्यवस्थेमध्ये कुचराई केली. हा एक गंभीर गुन्हा आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्था यामुळे त्रुटी दिसून आल्या, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

अभिराम कुमार हे बिहार राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांना मोठा प्रशासकीय अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्यावरील निलंबनाच्या कारवाई धक्कादायक मानली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे खुलासा मागवला होता. त्यांनी याबाबत खुलासाही केला. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी हा खुलासा अमान्य करत कारवाईची शिफारस केली होती.

Narendra Modi
Trump Vs Musk : अखेर मस्क यांची तंतरली; ट्रम्प यांच्यासमोर लोटांगण, दोन वाक्यांतच विषय कट...

अभिराम कुमार यांची अनुपस्थितीत जाणीवपूर्वक होती की त्यामागे अन्य काही कारण होते, याबाबत चौकशी सुरू आहे. बिहार सरकारने या कारवाईच्या माध्यमातून इतर अधिकाऱ्यांनाही सूचक संदेश दिला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेत असा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराच सरकारने दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com