Pakistani MP Sher Afzal Marwat’s video statement on Prime Minister Modi amid India-Pakistan tensions goes viral on social media.  sarkarnama
देश

Pakistani MP Sher Afzal Marwat - Video : ‘’मोदी मेरे खाला का बेटा है, जो मेरे कहने पै…’’ ; पाकिस्तानी खासदारालाही आहे मोदींची ‘गारंटी’?

Pakistani MP Sher Afzal Marwat comments on PM Modi : पंतप्रधान मोदींनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना, त्यांनी कल्पनाही केली नसेल असे प्रत्युत्तर दिले जाईल, असा कडक इशारा दिलेला आहे.

Mayur Ratnaparkhe

Sher Afzal Marwat’s Statement on India-Pakistan Relations : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर, भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय भारतानेही पाकिस्तानबाबत कठोर भूमिका घेतलेली आहे.

भारताकडून पाकिस्तानबाबत अनेक कडक निर्णय घेतले जात आहेत. शिवाय, पंतप्रधान मोदींनी आधीच या हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना त्यांनी कल्पनाही केली नसेल असे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिलेला आहे. शिवाय, त्या दृष्टीने नवी दिल्लीत आणि सीमेवर दररोज जलद हालचाली घडत आहेत.

हे पाहता भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करू शकतो, असं पाकिस्तानी मंत्र्यांना वाटू लागलं आहे. अनेकांना तशी धडकी भरल्याने त्यांच्याकडून उलटसुलट विधानं केली जात आहेत. अगदी पाकिस्तानचे पंतप्रधान, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री किंवा मग खासदार यापैकी कुणीही याला अपवाद ठरताना दिसत नाही.

त्यात आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे खासदार शेर अफजल खान मरवात यांची भर पडली आहे. त्यांचे एक विधान सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. शिवाय, त्यांच्या वक्तव्यावरून पाकिस्तानमध्ये सध्या किती दहशतीचे वातावरण आहे, हे देखील दिसून येत आहे.

पाकिस्तानी मीडियाकडून जेव्हा खासदार शेर अफडल खान मरावत यांना विचारलं केलं की, हिंदुस्तान आणि पाकिस्तानमध्ये जर युद्ध सुरू झाले तर तुम्ही बंदूक घेवून बॉर्डवर जाल का? तेव्हा यावर उत्तर देताना मरावत म्हणाले, ‘’नाही जर युद्ध वाढलं तर मी इंग्लडला जाईन.’’

त्यानंतर जेव्हा दुसरा प्रश्न करण्यात आला की , या परिस्थितीत तुम्हाला नाही वाटत का की मोदींनी जरा माघार घ्यायला हवी. त्यावर उत्तर देताना खासदार मरावत म्हणाले, ‘’मोदी मेरे खाला का बेटा है, जो मेरे कहने पर पिछे चला जाएगा.’’

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT