Amit Shah Sarkarnama
देश

Amit Shah : देशाला दोन पंतप्रधान, दोन राज्यघटना, दोन झेंडे कसे असतील? अमित शाह लोकसभेत संतापले

Lok Sabha : चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांमध्ये काही काळ शाब्दिक चकमक उडाली.

Rajanand More

Parliament Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षातील खासदारांना चांगलेच सुनावले. लोकसभेत तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा उल्लेख करत त्यांचा ‘एक देश, एक राज्यघटना, एक झेंडा’ हा नारा राजकीय होता, अशी टीका केली. त्यावर संतापलेल्या शाह यांनी तातडीने आक्षेप घेत प्रत्युत्तर दिले.

लोकसभेत (Lok Sabha) मंगळवारी जम्मू आणि काश्मीर आरक्षण विधेयक (सुधारणा) २०२३, जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक (सुधारणा) २०२३ ही दोन विधेयके सादर करण्यात आली. त्यावर चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांमध्ये काही काळ शाब्दिक चकमक उडाली.

तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत राय यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या नावाचा उल्लेख केल्यानंतर शाह यांनी त्यावर आक्षेप घेतला. ते म्हणाले, देशाला दोन पंतप्रधान, दोन राज्यघटना आणि दोन झेंडे कसे असू शकतात? ज्यांनी असे केले, ते चुकीचे होते. पंतप्रधान मोदींनी त्यात सुधारणा केली. आम्ही १९५० पासून या देशात ‘एक प्रधान, एक निशाण, एक विधान’ असा नारा देत आहोत आणि ते करून दाखवले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, सौगत राय म्हणाले की, गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० रद्द करत जम्मू आणि काश्मीर या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेश केले. यापूर्वी केंद्रशासित प्रदेशांचे राज्यांमध्ये रुपांतर केले जात होते. पण शाह यांनी उलटे केले. त्यातून काय साध्य झाले? भाजपने केवळ ‘एक प्रधान, एक निशाण, एक विधान’ हे आपले आश्वासन पूर्ण करण्यासाठी कलम ३७० रद्द केले.

श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या काळातील हा नारा होता. हे जम्मू आणि काश्मीरमधील लोकांच्या भल्यासाठी नाही. केवळ राजकीय वक्तव्य होते आणि त्यांची घोषणा होती, असा मुद्दा राय यांनी चर्चेदरम्यान उपस्थित केला होता. त्यावर शाह यांनी आक्षेप घेत प्रत्युत्तर दिले.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT